'कुतूहल'शनी ,गुरूच्या महायुतीचे🌟⭐

         
           युती हा शब्द  म्हटला की आपल्याला डोळ्यांसमोर येते ती राजकारणी लोकांची युती, पण यावेळी आपल्याला जरा वेगळीच  अप्रतिम अशी युती    
अनुभवायची आहे ती म्हणजे आकाशातील दोन सुंदर अश्या ग्रहांची.🌟⭐    
   गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर 6 ते 8.30pm या वेळेत पश्चिमेच्या आकाशात क्षितिजापासून 30° उंचीवर *दोन ठळक चांदण्या⭐⭐दिसत आहेत. इतर चांदण्यांप्रमाणे अजिबात न टिमटिमणाऱ्या या दोन्ही चांदण्या म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह गुरु व शनि आहेत. हे दोन्ही ग्रह  दुर्बिणीशिवाय सहजपणे पाहता  व ओळखता येतात .. 
🌟त्यांपैकी मोठी चांदणी म्हणजे गुरु ग्रह⭐ ... 
⭐तर छोटी चांदणी म्हणजे शनि ग्रह🌟 ...
गुरु हा सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सुर्यापासून सरासरी 80 कोटी किमी दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 12 वर्षे लागतात .
गुरु(jupiter)/बृहस्पती अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे.गुरु, शनी, युरेनस,आणि नेपच्यून यांना राक्षसी वायू ग्रह म्हणून संबोधले जाते,यांना jovian planet असे सुद्धा म्हणतात.प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव jupiter यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव देण्यात आले.गुरु हा ग्रह मुख्यत्वेकरून हायड्रोजन 90%व थोड्या प्रमाणात हेलियम10% चा बनला आहे.
या ग्रहाच्या वातावरणात मिथेन, पाण्याची वाफ,अमोनिया खडक यांचे अंश आहेत.या व्यतिरिक्त कार्बन,इथेन, हायड्रोजन सल्फाईड निऑन, ऑक्सिजन,फॉस्पिन व गंधक यांचेही अंश आहेत.बाह्य वातावरणात अमोनिया चे स्फटिक आढळून आले आहेत .गुरूच्या भोवती एक अंधूक कडे आहे,आणि शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे.गुरूला confirm63आणि    एकूण 79उपग्रह आहेत.त्यापैकी 4 उपग्रह गॅलिलिओने शोधले असल्याने त्यांना ग्यालिलिओन म्हणतात.गुरु हा ग्रह रात्री दुर्बिणीशीवाय दिसू शकतो.
.. तर शनि हा सुर्यमालेतील सर्वात सुंदर कडी असणारा ग्रह  सुर्यापासून सरासरी *150 कोटी किमी* दूर असून त्याला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास 29.5 वर्षे लागतात . 
सूर्यमालेतील सहाव्या स्थानावर असणारा ग्रह आहे.
शनिभोवती बर्फ व अंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहे.गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी त्याच्या भोवताली असलेल्या कडीमुळे अधिक प्रसिद्ध आहे.शनी ग्रहाभोवती असलेल्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहे.शनी ग्रह आकाराने मोठा असला तरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.म्हणजे शनी पाण्यात पडला तरी तो पाण्यावर तरंगेल.शनीला खूप चंद्र आहे,जवळपासconfirmed53उपग्रह आणि एकूण82उपग्रह.असा वैशिष्ट्य पूर्ण हा शनी आहे.
त्यामुळे पृथ्वीवरून रात्रीच्या आकाशात पाहताना त्यांची दर 20 वर्षांनी युती होतच असते. म्हणजे हे दोन्ही ग्रह जवळ आलेले दिसतात ..
या युतीमध्ये शुभ अशुभ असे काही नाही.या दोघांच्या एकत्र येण्याने जो गुरुत्वीय प्रभाव पडेल त्यात शुभ अशुभ असे काही नाही.याचा काही प्रभाव पडत असेल तर तो हाच की या ऐतिहासिक युतीचे साक्षीदार होण्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे.
      पण या दर वीस वर्षांनी होणाऱ्या युतीत गुरु व शनि विशिष्ट अंतरावर एकत्र येतात. मात्र या वेळी *21 डिसेंबर 2020 रोजी महायुती* घडेल , म्हणजे गुरु व शनि एवढे एकत्र येतील कि दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून *एकच चांदणी* दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था दिनांक 20 , 21, व 22 डिसेंबर पर्यंत पाहायला मिळेल.  त्यांची आकाशात कक्षेत फिरण्याची गती  व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळे हे दोन्ही ग्रह आपल्याला चिकटून असल्यासारखे भासतील यालाच गुरु व शनिची महायुती म्हणतात.याच दिवशी वर्षातील सर्वात लहान दिवस  सुद्धा आहे.यावेळी या दोन ग्रहांमध्ये फक्त 0.1°चे अंतर असेल.म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासाच्या 1/5इतके अंतर असेल ..
   22 डिसेंबर नंतर गुरु ग्रह शनिला ओलांडून पूर्वेकडे (वर ) सरकताना दिसेल त्या दोन्हीं ग्रहातील अंतर दिवसेंदिवस वाढत जाईल. 
       गुरु शनिच्या महायुतीची ही घटना 1623साली घडली होती. तेव्हा गॅलिलीओ गॅलिली नुकताच दुर्बीणी चा वापर करू लागला होता. आणि यानंतर ही घटना 2080 साली पुन्हा घडेल.म्हणजे अशी घटना अनुभवायला आपल्याला आणखी 60 वर्षे थांबावे लागेल, त्यामुळे आपणाला या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हीच एकमेव संधी आहे. तेव्हा ही संधी दवडू नका .
      आजपासून पुढचे 8 -10 दिवस रोज सायंकाळी सूर्य मावळल्यापासून आकाशात हे दोन ग्रह शोधूया . 
21 डिसेंबर पर्यंत या दोन ग्रहांतील कमी होत जाणारे अंतर
 गुरु आणि शनि या ग्रहांची युती

​सोमवार, २१.१२.२०२० या दिवशी सूर्यास्तानंतर ७.३० ते ९.३० या वेळेत पश्‍चिम दिशेला गुरु आणि शनि हे दोन ग्रह मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात चतुर्थ चरणात युतीयोगात येतील. ग्रहांची युती होणे, म्हणजे ग्रह एकाच राशीत एकाच अंशावर येणे. या घटनेला खगोलीय इंग्रजी भाषेत ‘ग्रेट कन्जेक्शन’ असे म्हणतात.
​आकाशात दिसणारी गुरु-शनि ग्रहांच्या युतीचे दृश्य साध्या डोळ्यांनी सहज दिसणार आहे. अधिक स्पष्ट पहाण्यासाठी दुर्बिण किंवा टेलिस्कोप वापरावा.
21 डिसेंबरची दोन्ही ग्रहांची महायुती आणि त्यानंतर या दोन ग्रहांत रोज वाढत जाणारे अंतर याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया .
     दुर्बीण असेल तर त्यातून हे दोन्ही ग्रह पाहणे ही सुद्धा एक मोठी खगोलीय संधीच असेल. पण दुर्बीणीशिवायही सर्वांना या घटनेचा अनुभव घेणे सहज शक्य आहे. 
रात्रीच्या आकाशात अशा अभूतपूर्व घटना घडत असतात आणि विश्वातील अनेक सत्य व आश्चर्य मानवासमोर उलगडत असतात. आपण मात्र ग्रहताऱ्यांच्या अज्ञानापोटी अंधश्रद्धा जोपासत ग्रह ताऱ्यांना राशी नक्षत्रांना घाबरत राहतो आणि निसर्गाने बहाल केलेल्या विश्वाला समजून घेण्याच्या संधी अवैज्ञानिक भितीपोटी गमावत राहतो ..
     शनि किंवा कोणताही ग्रह दुष्ट /वाईट /अशुभ नसतो. त्यामुळे शनिची साडेसाती ही निवळ अंधश्रद्धा आहे . कोणत्याही राशी नक्षत्रे आपले भविष्य ठरवत नाहीत आणि बिघडवतही नाहीत. आकाशाविषयी असणाऱ्या अशा अंधश्रद्धांना बळी पडून घाबरून ही संधी घालवू नये 
 ⭐🌟✨⭐🌟✨⭐🌟✨⭐🌟✨⭐🌟✨
                        
              
                 #कुतूहल शनी, गुरूच्या महायुती चे
                     #शनी#गुरू 

                           संदर्भ-इंटरनेट, इंटरनेट                   विकिपीडिया,चित्र-इंटरनेट 
                      
                               ⭐  @ujwala tayade ,akot

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....