'कुतूहल'हिवाळ्यातील मेथीविषयीचे........
हिवाळा हा ऋतू आहारासाठी सर्वोत्तम आहे.हिवाळ्यात आपल्याकडे आहारासाठी भरपूर पर्याय असतात.शिवाय हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते.
हिवाळ्यात भाजीपाला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो.भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे मेथी.या मेथी भाजीचे पण कुतूहल च आहे, काहींना ती आवडते तर काहींना ती तिच्या कडवट चवीमुळे आवडत नाही.
मेथीची भाजी खाल्ल्याने आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकतो.मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
मेथीचे दाणे किंवा मेथीची भाजीचे सेवन करणे मधुमेह चा त्रास असणाऱ्यासाठी फायदेशीर मानले जाते.
जर आपण मेथीच्या भाजीचे सेवन केले तर ते रक्तातील साखर नियंत्रित करते.मेथीच्या बियांमध्ये अमिनो ऍसिड असते.मेथीच्या भाजीने रक्तदाब सुध्दा नियंत्रणात राहतो.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा मेथीचा उपयोग होतो.
कारण आता बदलत्या जीवनशैली मुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे.मेथीच्या भाजीमध्ये नैसर्गिक फायबर असल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहते.मेथीमध्ये प्रोटीन असल्याने केसांच्या वाढीसाठी, केस जाड होण्यासाठी ,मजबूत होण्यासाठी मदत होते.आणि गळत असलेले केस पुन्हा मिळवण्यासाठी मदत होते.मेथीमुळे त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होते.यामध्ये अँटी ऑक्सिडंट असल्यानेआपल्या त्वचेला फ्रिऱ्याडीकलच्या नुकणासापासून वाचवते.जर आपण मेथीचे नियमित सेवन केले तर अकाली वृद्धत्व येत नाहीआणि सुरकुत्यांपासून मुक्त होण्याव्यतिरिक्त,मुरूम आणि त्याच्या डागांपासून मुक्त होऊ शकतो.
मेथी अत्यंत गुणकारी मानल्या जाते .
केवळ मेथीच नाही तर मेथी दाणे/बी सुद्धा उपयोगी आहे.संपूर्ण भारतात मेथीचे सेवन केले जाते.हिवाळ्यात लाडूमध्ये मेथीदाणे घातले जातात.सुकवलेल्या मेथीची पाने, कसुरी मेथी,मसाला म्हणून घातल्यास भाजी आणखी रुचकर बनते.
मसाल्यात मेथीचे बी वापरले जाते,मोड आलेल्या मेथीदाण्यांची उसळ पण बाळंतिणीला खायला देतात.मेथी दाणे ऍनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयोगी आहे मेथीदाण्यांमध्ये बहुमूल्य औषधी गुणधर्म आहेत.कोलेस्टेरॉल डायबेटीस च्या रुग्णांना अमृतासमान आहेत.
मेथीदाणे आर्थरायटीस,सायटिका, अपचनाची समस्या दूर करतात.मेथीदाण्यांमध्ये असलेले फायबर आणि स्टिरॉइड्स दोन पध्दतीने काम करतात,एक म्हणजे इन्सुलिन ची संवेदनशीलता वाढवतात दुसरे म्हणजे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.सोबतच मेथीदाण्यांमुळे रोगप्रतिकारक शक्तीतही वाढ होते.
मेथीच्या भाजीतील डायोस्जेनिन ,आयसोफ्लेविन,आस्टोजेन मुळे स्त्रियांना आराम मिळतो.मेथीच्या भाजीमुळे शरीरात पुरेसे लोह मिळते.
100gm मेथीच्या भाजीत
4gm प्रथिने,6gm कर्बोदके,1gm स्निग्ध पदार्थ,0%कोलेस्टेरॉल,1gm फायबर्स,395gm कॅल्शियम,2mg लोह, हे पोषकघटक असतात.शिवाय मेथीमध्ये क, आणि के हे दोन्ही जीवनसत्त्वे असतात.
हिवाळ्यात तर मुलांच्या डब्यात मेथी पराठे उत्तम पर्याय आहे, मी तर माझ्या मुलाच्या टिफिन मध्ये दररोज मेथीचे पराठे देते,अर्थात सासूबाई छान नातवासाठी मस्त मेथीचे पान निवडून देतात .☘️. मुलं छान आवडीने खातात.मेथीचे मुटकुळे पण छान होतात. कच्ची मेथी कोशिंबिरीत आणि इतर पदार्थात टाकून तो पदार्थ पौष्टिक आणि रुचकर होतो. आहे न हिवाळ्यातील मेथीचे 'कुतूहल'.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
# कुतूहल हिवाळ्यातील मेथीचे
#मेथी
#मेथी बिया
@उज्वला तायडे, अकोट
Very useful information.. .. खरंच मेथी खूप पौष्टिक आहे
ReplyDeleteKhup chaan mahiti. Ani uttamm likhan
ReplyDelete