'कुतूहल' रक्तातील महत्वाचा घटक...प्लेटलेट्स platlets चे........,💉
आता आपण बरेचदा म्हणजे पावसाळा संपत आला की ऐकून असतो प्लेटलेट्स /पेशी कमी झाल्या म्हणून. कारण मलेरियाच्या डासांची संख्या ह्यावेळी जास्त वाढलेली असते. कालच एका मैत्रिणीने सांगितले माझ्या मुलाला Dengue maleria झाला त्याच्या पेशी कमी झाल्या .मुलाला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये होती.तेव्हा म्हंटले की असावी थोडी फार माहिती सर्वांनाच प्लेटलेट्स विषयी.
plasma प्लाझ्मा प्रमाणे platelets देखील रक्तातील महत्वाचा घटक आहे. रक्त पातळ होवू न देण्याचं तसच रक्तवाहिन्याना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या प्लेटलेट्स करतात.या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना'प्लेटलेट्स'हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसठी वैद्यकीय भाषेत 'थ्रोम्बोसाईट्स'ही संज्ञा वापरली जाते.
ह्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्यांना "मानवी शरिराची कवचकुंडलं "असे देखील म्हटले जाते कारण शरीरात जखम झालेल्या ठिकाणी ह्या प्लेटलेट्स आणि fiber एकत्र येवून रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
रक्तवाहिन्यांमधून वाहणार रक्त हे प्रवाही राहणं महत्वाचं असतं, ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातूनच होतं. त्याचबरोबर रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशिस्तरांवर पोषण करते .एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होवू शकते.तसे रक्तामध्ये प्रामुख्याने 3पेशी लालपेशी(RBC),पांढऱ्या पेशी(WBC), प्लेटलेट्स, असतात.
त्यापैकी platlets ची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. प्लेटलेट्स ह्या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत(Red bonemarrow)असणाऱ्या मेगा कॅरो साईट्स या पेशींपासून तयार होतात, यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधरणपणे 5-9दिवसांचं असतं.
प्लेटलेट्स ची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास रक्ताची गुठळी होवून रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाहला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधीर होवून निकामी होवू शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरड्यांमधून ,थुंकीतून रक्त पडतं.
प्लेटलेट्स कमी झाल्यास त्या बाहेरून घ्याव्या लागतात.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सच प्रमाण नियंत्रित ठेवता येत. आपण आहारात काही पदार्थांचा समावेश करून blood platlets नैसर्गिक पध्दतीने वाढवू शकतो.
जसे पपई, गुळवेल, आवळा, पालक, भोपळा, नारळपाणी, बीट ह्यामुळे प्लेटलेट्स वाढण्यासाठी मदत होते. परंतु की कशी....
पपई-पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हीही कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढण्यास मदत होते.याची पाने पाण्यात उकळून चहा प्रमाणे घेवू शकतो.
गुळवेल-गुळवेल चे juice blood प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत करते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. गुळवेल ची कांडी पाण्यात रात्रभर भिजवून ,सकाळी उठून गाळून पाणी पिल्याने सुद्धा प्लेटलेट्स वाढतात.
आवळा-आवळ्या मध्ये भरपूर प्रमाणात vitamin' c' असते, प्लेटलेट्स आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते, juice पण गुणकारी आहे.
पालक-पालकांमध्ये vitamin 'k' भरपूर प्रमाणात उपलब्ध असून कमी प्लेटलेट्स विकाराच्या उपचारासाठी उपयोग केला जातो.माझ्याकडे मात्र मी बनवलेली 'आवळा candy' famous आहे☺️.
भोपळा-भोपळा कमी प्लेटलेट्स counting मध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा मध्ये vitamin 'A'ने समृद्ध असल्याने प्लेटलेट्स चा योग्य विकास होण्यास मदत करतो. याच्या juice मध्ये मध टाकून घेतल्यास प्लेटलेट्स ची संख्या वाढते.
नारळपाणी-नारळ पाण्यात electolytes भरपूर प्रमाणात असल्याने blood प्लेटलेट्स ची कमतरता भरून काढण्यासाठी उपयुक्त आहे.
बिट-बीटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने blood प्लेटलेट्स ची संख्या जलद गतीने वाढते. बीटचे सेवन प्लेटलेट्स वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि haemostatic गुण असतात.
दोन वर्षांपूर्वी माझ्या शाश्वत ला मलेरिया मध्ये प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला खूप त्रास होत होता, अक्षरशः चालताना म्हणायचा की, मम्मा माझ्या पायाला break लागल्यासारखे होत आहे. चालतासुद्धा येत नव्हते त्याला ह्या सर्व उपायांचा भरपूर उपयोग झाला होता तेव्हा.
तसेही आता corona ,covid-19सगळीकडे चांगलाच पसरलाय, त्यात इतर अनेक आजार ही म्हणून मग थोडे नैसर्गिक पध्दतीने प्लेटलेट्स वाढवणे कधीही चांगलेच .
#कुतुहल प्लेटलेट्स चे...
#platlets
#blood platlets#RBC #WBC
#पपई#गुळवेल#आवळा#पालक#भोपळा#नारळपाणी#बीट
संदर्भ-माहिती इंटरनेट, मराठी विश्वकोश
चित्र-इंटरनेट
@उज्वला तायडे ,अकोट
खूप छान प्लेटलेट बद्दलची माहिती
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteसर्वांना या माहितीचा उपयोग होईल सध्या गरजही आहेच ,छान md
ReplyDeleteGood information....continue your writing....best wishes dear
ReplyDeleteVery good ,&usefull
ReplyDeleteinformation