'कुतूहल'आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्याचे.....🌈

           🌈⛈️🌅🌄☀️🌦️💦⛅💧🌨️🌦️🌧️🌈
इंद्रधनुष्य दिसणे हे एक अवकाशातील 'कुतूहल 'च आहे.
सर्वसाधारणपणे पावसाळ्यात घडणाऱ्या ह्या घटनेचे कित्येकांना कौतुक वाटत असते. डोळ्यांना अतिशय सुखद असणारी ही घटना आहे.
सुर्यप्रकाशामुळेच आपण सभोवताली असणारी सृष्टी बघू शकतो ,प्रकाश नसता तर सगळीकडे आपल्याला अंधार आणि अंधारच दिसला असता .सुर्यप्रकाशिवाय आपण मानवी जीवणाची कल्पनाच करू शकत नाही.🌄.
मला तर लहानपणापासून च ह्या घटनेचे भारी वेड.
खास आनंद घ्यायचा असला तर श्रावण महिन्यात घेता येतो. लहानथोरांपासून सर्वांनाच इंद्रधनुष्य बघावसा वाटतो.
कदाचित इंद्रधनुष्याला त्याच्या आकारामुळे त्याचे हे नाव मिळाले असावे असे मला वाटते, कारण त्याची रंगीत कमान धनुष्यासारखी दिसते म्हणून.🌈
इंद्रधनुष्य म्हणजे काय तर आकाशात दिसणारी सात रंगांची उधळण. इंद्रधनुष्य जो व्यक्ती बघतो त्याच्या पाठीशी सूर्य क्षितीजापासून फार उंचावर नसेल तर सकाळी पश्चिमेला व संध्याकाळी पूर्वेस पाऊस पडत असताना आकाशात जे विविधरंगी अर्धवर्तुळं दिसते ते म्हणजे इंद्रधनुष्य.(Rainbow)
इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.आता इथे थोडं physics येतं,प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे नेत्रदीपक असा इंद्रधनुष्य.
तुमच्या ,माझ्या सभोवताली असणारा सूर्यप्रकाश देखील इंद्रधनुष्याच्या सात रंगांनी बनला आहे. जेव्हा सर्व सात रंग एकत्र मिसळले जातात तेव्हा मात्र आपल्याला ,प्रत्येक दिवशी दिसणारा प्रकाश पांढरा दिसतो.
आपल्याला आपल्या सभोवतालची सुंदर सृष्टी दिसते, अनुभवता येते ती फक्त सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वामुळे .
वैज्ञानिक न्यूटन ने सर्वप्रथम इंद्रधनुष्य कसा तयार होतो हे सांगितले.
         जेव्हा सूर्यप्रकाश एकाच दिशेने हवेच्या माध्यमातून प्रवास करतो तेव्हा तो आपल्याला पांढरा दिसतो .जेव्हा सूर्यप्रकाश एका पावसाच्या थेंबाच्या माध्यमातून प्रवेश करतो तेव्हा पहिल्यांदा प्रकाशाचे त्या थेंबात वक्रीभवन होते ,म्हणजेच थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. त्यानंतर पावसाच्या थेंबामध्ये त्याचे 
संपूर्ण आंतरिक परावर्तन/अंतर्गत प्रतिबिंब होते.(Total internal reflection).हा एक वक्रीभवणाचा प्रकार आहे बरं.त्यानंतर या पावसाच्या थेंबात त्याचे प्रतिबिंब reflection होत जाते आणि नंतर प्रकाश विरुद्ध पृष्ठभागाच्या माध्यमातून वक्रीभवन होवून पावसाच्या थेंबातून बाहेर पडतो.
वक्रीभवणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वेगवेगळ्या wavelengths आणि वेगवेगळ्या energy lavel /ऊर्जा पातळीमुळे रंग वेगळे होतात ,प्रकाश ऊर्जेतील या रंगीत किरणांचे ,एक विविध रंगी कमानीत रूपांतर होते.
सुर्यप्रकाशद्वारे तयार झाल्याने इंद्रधनुष्य नेहमीच सुर्याच्या थेट विरुद्ध बाजूच्या आकाशात दिसतो बरं.
लहानपणी इंद्रधनुष्य रंग लक्षात राहण्याची एकमेव पध्दत म्हणजे (ता, ना, पि, ही, नि, पा, जा)असे म्हणत जोरजोरात ओरडणे.🔊📣
तांबडा, नारिंगी, पिवळा,हिरवा, निळा, पांढरा, जांभळा, असे आहेत बरं रंग उलट्या क्रमाने.🌈.
जेव्हा तांबडा रंग बाहेरच्या बाजूला व आतील बाजूला क्रमाने नारिंगी, पिवळा, हिरवा,निळा,गडद निळा व जांभळा रंग दिसतात याला प्राथमिक इंद्रधनुष्य म्हणतात काही वेळा या इंद्रधनुष्याच्या वरच्या बाजूस पाहिले असता दुसरे इंद्रधनुष्य दिसते ,परंतु हे प्राथमिक इंद्रधनुष्यपेक्षा फिकट असून त्यात रंगाचा क्रम उलटा म्हणजेच बाहेरच्या बाजूस जांभळा व आतल्या बाजूस तांबडा असा असतो. आणि मग यालाच दुय्यम इंद्रधनुष्य म्हणतात.🌈🌈 
        
              प्राथमिक इंद्रधनुष्याच्या आतील व दुय्यम इंद्रधनुष्याच्या बाहेरच्या कडांजवळपासचे  आकाश इतर भागापेक्षा पुष्कळच उजळ दिसते व दोन इंद्रधनुष्यामधील आकाश काळसर दिसते.
कोनीय दृष्टया सूर्य जेवढा क्षितीजावर असतो तेवढाच क्षितिजाखाली इंद्रधनुष्याचा मध्यबिंदू असतो .त्यामुळे सर्वसामान्यपणे इंद्रधनुष्य अर्धवर्तुळ रचनेरूपात न दिसता कमी दिसतो .
कित्येक वेळा समुद्रावर पाऊस पडत असताना समुद्राच्या पृष्ठावरून परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशाने सुद्धा इंद्रधनुष्य तयार होतो. याचा मध्यबिंदू मात्र क्षितीजावर असतो.
एरवी इंद्रधनुष्य अर्धवर्तुळापेक्षा लहान दिसत असला तरी उंच टेकडीवर उभे राहून जवळपास पडणाऱ्या पावसाकडे पाहिले असता पूर्ण वर्तुळाकार पण दिसू शकतो बर का.
आणि ही सर्व नयनरम्य अशी घटना शोधून काढण्याचे काम केले ते न्यूटन नि ,त्याने सर्वप्रथम काचेच्या लोलकातून(prism) मधून या सात रंगाच्या वर्णपंक्ती शोधून काढल्या.
सहज म्हणून जर इंद्रधनुष्य बघायचा असेल तर सूर्याकडे पाठ करून तोंडाने पाण्याचा फवारा उडवला असता  देखील इंद्रधनुष्य दिसतो. अर्थातच लहानपणी असे practical बरेचदा केले आहे.
धबधब्याच्या ठिकाणी उडणाऱ्या तुषारांमुळे ही इंद्रधनुष्य दिसतो.घरी मुलांसोबत soap bubbles उडवताना सुद्धा इंद्रधनुष्याचे रंगांची मजा, आनंद लुटता येतो.
पण इंद्रधनुष्य बघण्याचा खरा आनंद मात्र श्रावणातच येतो, खऱ्या नैसर्गिक घटनेचा नेत्रदीपक सोहळा म्हणजे इंद्रधनुष्य बघणे.
माणसाच्या आयुष्यात ही असेच इंद्रधनुष्याचे रंग असतील तर आयुष्य खूप सुंदर रंगीत होइल, कुणाकडेच दुःखाचे काळे ढग राहणार नाहीत.
कुणीतरी म्हटले आहे "Try to be a Rainbow in someones cloud".
प्रत्येकाच्या जीवनाचे रंग सुद्धा इंद्रधनुष्य असतात वेगवेगळे, जेव्हा सर्वच रंग एकत्र येतील, तेव्हाच सर्वांचे इंद्रधनू प्रमाणे सुंदर होईल.🌈
मानवी जीवन हे सुद्धा एक इंद्रधनुष्य सारखे आहे ,की ज्याचे रंग दिसायला दोन्ही ऊन(सूर्य)आणि पाऊस यांची गरज असते.
आहे न 'कुतूहल' निसर्गातील इंद्रधनुष्याचे.

,🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
       #कुतूहल इंद्रधनुष्याचे
#इंद्रधनुष्य
#Rainbow
#इंद्रधनुष्याचे सात रंग
#कुतूहल आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्याचे
                            संदर्भ-मराठी विश्वकोश
                                Edvin E -light for 
                                   Students
                                Noakes G.R.AText of
                                           Light 
                               आकृती, माहिती -text book 
                               Of 10th
                         @उज्वला tayade ,अकोट
               

Comments

  1. छान लिहिलं आहे. ललित आणि विज्ञान यांचा मेळ घातला आहे. अशा रीतीने अधिकाधिक वैज्ञानिक शब्द, संकल्पना मराठीत आणणं आणि साठवून ठेवणं आवश्यक आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. खुपच कुतूहल आहे खर गोष्टीच आणि हे तू मस्त च समजावून सांगितलंस,असच नवीन विषयच कुतूहल घेऊन ये ग परत,पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  3. Very good information about rainbow

    ReplyDelete
  4. फारच छान माहिती आहे

    ReplyDelete
  5. I like so much rainbow.. mast.. Scientific information. . Detail.

    ReplyDelete
  6. लहानपणा पासून पावसामध्ये जी गोष्ट आकर्षित करते ती म्हणजे इंन्द्र्धनुष्य, आपण फारच सुंदर पद्धतीने मांडले आहे. त्यात वैद्यानिक माहिती सांगितलीआहे. फोटो खूप छान आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....