'कुतूहल 'सुदृढ, सुंदर हृदयाचे.....♥️
आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येवून अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होवू शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. आपल्या देशात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 32%मृत्यू हृद्यरोगामुळे होतात ,प्रत्येक घरात 1 हृदय रोगी आढळतो, त्यामुळे 'जागतिक हृदय दिन'असे दिवस साजरे करून हृद्यरोगविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होवू नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी ,हृदय कसे सुदृढ ठेवावे हे माहीत असणे गरजेचे आहे.....
पहिले तर मला याचेच कुतूहल वाटते की हृदयाला एका विशिष्ट symbol ♥️मध्ये सिनेमात represent करतात, त्याहीपेक्षा आणखी एका गोष्टीचे कुतूहल वाटते की दरवर्षी heart, circulation, double circulation हा part वर्गात घेत असताना ,हृदयाची संरचना घेताना लगेच एखादा विध्यार्थी उठून ♥️ अशी हृदयाची संरचना क्षणाचाही वेळ न लावता काढून दाखवतो. असो its about hammering of media.मग त्यांना logically सांगते,हृदयाच्या चार कप्प्यांपैकी वरच्या बाजूला दोन आलिंद (auricle),खालच्या बाजूला दोन निलंय (venticles)म्हणून असा आकार असतो♥️.
हृदय हा एक सर्व शरीराला रक्त पुरवणारा आणि परत सर्वशरीरातून रक्त खेचनारा, तसेच कधीही विश्रांती न घेता सतत चालणारा जिवंत पंप आहे. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगाड्यांमध्ये, दोन्हीही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे डाव्या बाजूला कललेले असते .प्रत्येकाच्या हृदयाचा आकार आपल्या मुठीऐवढा असतो. वजन साधारणपणे 360gm असते. हृदयाभोवती दुपदरी आवरण असते आणि ह्या दोन थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो. त्यामुळे घर्षणापासून धक्क्यापासून हृदयाचे संरक्षण होते.
श्वाशोश्वासाप्रमाने हृदयाचे आकुंचन प्रसरण एक min जरी बंद पडले तरी मनुष्य जिवंत राहू शकत नाही.
Coronary artery द्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवले जाते. या coronary artery मध्ये रक्ताची गुठळी झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो आणि मेंदूचे कामकाज थांबते .
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात चरबीचे थर जमतात. या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला की थोड्या श्रमाने देखील हृदयाचा प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज असते त्या वेळी उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती, भावना अनावर होणे.
ही कमतरता जाणवू लागते. मात्र प्रत्यक्षात हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरु झालेले असतात.
हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीतजास्त पायी 🚶🏃चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा.🚲.आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्याचा समावेश असावा, नियमित फलाहार घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीत, गाणे ऐकणे, गाणे म्हणणे, बागकाम, वाचन ,निसर्ग सान्निध्यात वेळ घालवणे, कुटुंबासोबत वेळ घालवणेआणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखाद्या छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे, एकंदरीत काय तर चांगल्या सवयी बाळगणे.
कारण हृदयरोग होण्यासाठी निश्चित असे वय नाही. तो कोणत्याही वयात होवू शकतो. यासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्यायला हवी, त्यात रक्तदाब, cholesterol आणि मधुमेहाचीही तपासणी होते. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.
कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहने कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर, मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्या गोष्टी ताबडतोब बंद करायला हव्यात. सतत कोणाशी तरी बोललं पाहिजे कारण बोलल्याने मन मोकळे आणि प्रसन्न होते, तेव्हा मनात काही ठेवू नये.....
Because sharing is so important... अडचणी, समस्या share करायच्या म्हणजे ताण कमी होतो.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे healthy lifestyle बाळगायची म्हणजे सकस आहार घ्यायचा.मोड/कोंब आलेली धान्य, पालेभाज्या, इ.
आधीच काही आजार असलेल्या लोकांना covid-19 या आजराचा जास्त धोका आहे. यामध्ये मोठी संख्या हृद्यरोगीनची आहे. हृदयरोग असलेल्या लोकांना सामान्यप्रामाणेच covid च्या संसर्गाचा धोका आहे. तो होवू नये म्हणून सर्वसामान्य पेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. covid ची बाधा आधी फुफ्फुसांला तर त्या खालोखाल हृदयाला धोका असतो. त्यामुळे हृदयरोग असलेल्या व्यक्तीने विशेष काळजी घ्यायला हवी.
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. व्यायाम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असताना ते कमी होतात .लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्याची संख्या जास्त असते.
ह्या हृदयावरील भरपूर गाणी प्रसिध्द आहेत,movie आहेत.
थोडक्यात काय तर आपले हृदयसुदृढ, सुंदर ठेवण्यासाठी आपले छंद जोपासणे, व्यायाम,positive thinking ठेवणे, तणावमुक्त जीवन जगणे ,आनंदी राहणे, छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेणे, व्यक्त होणे,जवळच्या व्यक्तीसाठी वेळ देणे,meditation, yoga,राग न येणे हे आवश्यक आहे.
A fit body, a calm mind, a house full of love.
'Eat healthy, drink healthy, stay healthy'
Beacause" health is wealth".
♥️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
#कुतूहल सुदृढ, सुंदर हृदयाचे
#सुदृढ हृदय
#healthy heart
# Circulation
संदर्भ-विश्वकोश
चित्र-इंटरनेट, पाठ्यपुस्तके
@ उज्वला तायडे, अकोट
हृदय च जिंकल MD
ReplyDeleteखूप छान लिहिलं ....Heart म्हणजे दिल म्हटलं की विद्यार्थ्यांना मोठे कुतूहल वाटतं.याचा आकार ❤असा का आहे अशी विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा असते.मग मी सांगते की, हार्ट मध्ये दोन auricleआणि दोन ventricle असतात वरच्या बाजू ला auricle पसरट असतात आणि ventricle निमुळते असतात त्यामुळे दिल ❤ हृदयाचा असा आकार तयार होतो .
ReplyDeleteGood 👍👍
ReplyDeleteहृदयाच्या भागांची, नलिकांची मराठी नावं जतन होतील. नेहेमीप्रमाणे सहज सोप्पं करून महत्वाची शास्त्रीत माहिती लिहिलीत 👍
ReplyDeleteसुंदर माहिती
ReplyDeleteKhup Chan 👌👏
ReplyDeleteछान माहिती दिली
ReplyDelete