'कुतूहल' निसर्ग पर्यटनाचे....

                        
                       पर्यटन ,प्रवास म्हंटले की सर्वांनाच आनंद होतो .सहलीला जायचे म्हणजे सर्वांचे चेहरे प्रफुल्लित होतात, शाळेत तर सहलीचा नुस्ता विषय जरी काढला तरी सर्वांची लगबग सुरु होते, सर्वच आनंदी होतात. सहलीवरून परत आल्यावर  नव्या उत्साहाने, नव्या जोमाने ,नव्या ऊर्जेने विध्यार्थी अभ्यासाला लागतात. पर्यटन म्हणजे अगदीच थोरामोठ्यांपासून तर लहानांपर्यत आवडीचा विषय असतो.
"केल्याने देशाटन, पंडित, मैत्री,सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन ,मनुजा चातुर्य येतसे फार ".
या अवघ्या दोन ओळीत कविश्रेष्ठ मोरोपंत यांनी पर्यटनाची महती गायली आहे .यावरून राष्ट्रीय, तसेच जागतिक पर्यटनाचे किती महत्व आहे हे लक्षात येईल.
 पर्यटन म्हणजे काय तर ,एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास.....
आजकाल आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येनी, अडचणींनी, विचारांनी घेरलेला आहे. सर्वच कशा तरी,कोणत्या तरी समस्येत गुंतलेले आहेत. त्यामुळे आनंद, हास्य, खुशी कुठे तरी कमी होत आहे. यावर्षी तर संपूर्ण जगच corona, covid-19सारख्या आजारात व्यस्त आहे.😷.
अशावेळी पर्यटन महत्वाची भूमिका बजावते. प्रत्येक व्यक्ती ने आपल्या जीवनात वर्षांतून काही काळ हा पर्यटनासाठी राखून ठेवला पाहिजे. शरीर स्वास्थ्यासाठी पर्यटन महत्वाचे आहे.पर्यटन फक्त आपल्या जीवनात सुखाचे, आनंदाचे क्षण आणत नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक विकासात ही महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यासाठीच 27 सप्टेंबर 1980 मध्ये संयुक्त राष्ट्राने विश्व पर्यटन दिवस म्हणून घोषित केला.

मुलं आपल्या आईवडिलांसोबत किंवा शिक्षकांसोबत प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय, उद्यान, विज्ञान संग्रहालय, तारांगण अशा ठिकाणांना नेहमीच भेट देतात. पण या भेटी दरम्यान'शिक्षण' व 'गंमत' यात फरक करणं अवघड असतं. अशा भेटी एक तर निव्वळ 'सहली'तरी असतात किंवा शैक्षणिक सहली असतील तर त्यातली मज्जाच निघून जाते.रामन science centre,नेहरू science centre अश्या ठिकाणी त्यांना प्रयोगाच्या माध्यमातून खेळायला मिळते म्हणून ही ठिकाणे आवडतात.
निसर्गाचा आनंद कसा घ्यावा आणि त्यासाठी कुठे जावं ही कित्येकदा समस्या असते. आपल्याला वाटतं की निसर्गाच्या सानिध्यात जाण्यापूर्वी त्याबाबत संपुर्ण ज्ञान असलं पाहिजे. परंतुआपण जसजसे निसर्गाच्या सानिध्यात राहू तसतसे ज्ञान मिळत जातं.

आधुनिक पूर्व काळातील प्रवासाची उद्दिष्टे प्राधान्याने धार्मिक व्यापारी व विद्यायनात्मक असत. पश्चिमी प्रबोधन काळापासून एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन हा इहलोकनिष्ठ होवू लागला व सांस्कृतिक, ऐतिहासिक कालवाङ्मयीन  नव्याजुन्या निर्मितीबद्दल नवे आकर्षन निर्माण झाले. आधुनिक पर्यटन दृष्टीचा आरंभ तेव्हापासूनच झाला असे म्हणता येईल ही दृष्टी केवळ धनिक वर्गापूर्तीच मर्यादित न राहता ती सर्वसामान्य लोकांनाही निर्माण होवू लागली. निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्यासाठी आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मूलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे.
आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशांबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे.
पूर्वी पर्यटन म्हंटल की एकच पर्यटन स्थळ असायचं.... मामाचे गाव..............
झुक झुक ,झुक झुक आगीनगडी !धुरांच्या रेषा हवेत काढी!
पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया.!....
पूर्वी परीक्षा सुरू असताना ,परीक्षा जवळ आली असताना अभ्यासापेक्षाही सुट्ट्यांमध्ये काय, काय धमाल करायची याचाच विचार डोक्यात चालू असायचा. कारण त्यावेळी फक्त मामाचा गाव हेच एकमेव पर्यटन स्थळ असायचे....
           आता मात्र चित्र बदललंय, मामाच्या गावाच्या जागी आता मुलं एखादा समुद्र किनारा, water park, amuzment park,थंड हवेचे ठिकाण, पावसाळी धबधबा, किंवा घनदाट जंगल, याचं planning पर्यटनाला केलं जातं. सुट्टीमध्ये भेट देण्याची ठिकाणं बदलली. साहजिकच आहे, बदल काळाची गरज आहे.
दरवर्षी आम्ही सर्व बहीण भावंड सुट्ट्यांमध्ये आपल्याला कुटुंबातील सदस्यांसाहित एकत्र बाहेरच्या पर्यटन स्थळी जात असतो. मुलांना सुद्धा नातेसंबंध समजणे महत्त्वाचे असते.
आमच्या परीसरात मेळघाट मध्ये असणारे सुराई धबधबा, नरनाळा किल्ला ,धारगड ह्या ठिकाणी दरवर्षी सातत्याने जात असतो तरीदेखील तेथील निसर्गाच्या सानिध्यात वारंवार जावेसे वाटते.
आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव दूर करायचा असेल तर निसर्ग पर्यटन हवेच, निसर्गाच्या सानिध्यात जायला हवेच.
निसर्गसौंदर्याने, निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात केलेल्या पर्यटन नाने, बराच ताण कमी होतो.
माणसाला सध्या गरज आहे ती फक्त चंगळवादी वृत्ती बदलण्याची, काही सवयी अंगी बाणवण्याची व डोळसपणे निसर्गाकडे बघण्याची. या समृद्ध नैसर्गिक ठेव्याचा आपण आनंद घेतानाच उद्याच्या पिढीलाही त्याची गोडी चाखायला मिळावि एवढीच काळजी एक जागरूक पर्यटक म्हणून घेऊया.
एक मराठी छान गाणं सुद्धा आहे यावर ,'हिरवा निसर्ग हा भवतीने ,जीवन सफर करा मस्तीने,....
मामाच्या गावाला तर भरपूर भेटून झालं. आता म्हणूया की चला,'निसर्गाच्या गावाला जाऊया.
🌱🏞️🛫🌱⛵🚘🌱⛴️🚗🌱 🚂🛣️🛤️🌱  🚝🌱🚞🚎🚋 🌱 🌄🌅🏝️🌱🏝️🏜️✈️🌱             
           #कुतूहल  
                 निसर्ग पर्यटनाचे
             #पर्यटन
              चित्र-इंटरनेट
            
               @सौ. उज्वला तायडे 

Comments

  1. खुप छान मॅम👍👍

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. It is an Inspiring article which took me to my ...school vacations which was a combination of growth with nature & relations...
    That is how we received education of our culture

    ReplyDelete
  4. निसर्गाच्या गावाला जाऊया , छानच
    M D

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....