'कुतूहल' ओझोनच्या संरक्षक छत्रीचे...🌍.⛱️☔🏖️

☂️⛱️☂️⛱️☂️⛱️☂️⛱️☂️⛱️☔⛱️☔⛱️☔
हो,'कुतूहल 'ओझोनच्या संरक्षक  छत्रिचे ........
☔छत्री आपल्याला बहुतकरून पाऊस, उन्हापासून संरक्षण देते, परंतु निसर्गात पृथ्वीभोवती असणाऱ्या ozone च्या संरक्षक कवचाच्या छत्रीचे काय?ते तर आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीचे संरक्षण करते .म्हणूनच मी त्या ozone च्या कवच्याला छत्री म्हटले☂️.
पण आपण काय करतो आहोत, त्या संरक्षक छत्रीलाच भोकं/छिद्र किंबहुना भगदाड पडण्याचे काम आपल्या कृतीतून करत आहोत. आणि म्हणूनच मग आज आपल्याला ओझोन संरक्षण दिवस साजरा करावा लागत आहे. मग काय जाणून घ्यायचे का या ozone च्या संरक्षक छत्रीचे 'कुतूहल'
आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला म्हणजेच पृथ्वीवरील सर्वच सजीवांना जगण्यासाठी oxygen म्हणजेच प्राणवायूची आवश्यकता असते. ऑक्सिजन आपल्याला वनस्पती कडून मिळत असतो तो ही फुकट बरं. आणि आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड/धोंडा मारण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे काय तर आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करत आहोत.🌱त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला कदाचित,' हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृनाच्या मखमालीचे 'ही कविता फक्त green karpet दाखवूनच अनुभवावी लागेल.
ओझोन हा वायू मुळात ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू चा संयुग आहे जो की oxygen च्या 3 अनुनपासून बनला आहे. 03 असे त्याचे रेणुसूत्र आहे. ओझोन वायूचा हा थर पृथ्वीपासून 16ते23km च्या पट्ट्यात  म्हणजे   sratoshere या थरात आढळतो .या ozone मुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील (ultra violet rays) किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बचाव होतो.🌍.
हवेतील नायट्रोजन मधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने 3भाग पडतात ,UV-A, UV-B, UVC-35Km उंचीवर डायॉक्सिजन आणि ओझोन यांच्यामुळे UV-Cकिरणे शोषली जातात ,जी की सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. UVB-किरणे त्वचेसाठी हानीकारक असतात त्यामुळे त्वचेचा कर्करोग होवू शकतो. ओझोनच्या थरामुळे UVB-किरणे बऱ्याच प्रमाणात शोषली जातात. UV A-किरणे ओझोन थरातून आरपार जातात. ही किरणे पृथ्वीपर्यंत जशीच्या तशी पोहचतात .परंतु UV-Aकिरणे सजीवांना कमी प्रमाणात हानिकारक असतात. 
काही रासायनिक संयुगामुळे ओझोन थराचा क्षय होवू शकतो. या संयुगामध्ये नायट्रिक ऑक्साईड (NO), N2o,OH हैड्रोक्सिल, chlorine, ब्रोमीन, chlorofloro carbon, ब्रोमो फ्लूरो कार्बन.
उत्तर गोलार्धातील ओझोनचे प्रमाण दर दशकाला 4%नी कमी होत आहे.CFC चे आयुष्य50ते100 वर्षे असते त्यामुळे त्यावर निर्बंध देखील घालण्यात आले होते.
आजकाल आपण जागतिक तापमान वाढ, पर्यावरण प्रदूषण, हरितगृह वायू उत्सर्जन हे विषय सतत अभ्यासत असतो. सध्याचे तापमान वाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वेकरून हरितगृह परिणामामुळे होत आहे.
पृथ्वीलागतच्या वातावरणामध्ये कार्बन डायॉक्साईड  
C 0२व अश्याच अन्य मिथेन, nitrus oxide, पाण्याची वाफ या वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. त्यामुळे तापमानात वाढ होते.औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून मानवी क्रियांमधून कार्बन डायॉक्साईड वाढला. आता ह्या मानवी क्रिया कोणत्या ,तर जीवाश्म इंधन, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, जंगलतोड, जमीन वापरातील बदल, मातीची धूप, आणि शेती(सर्वच पशु)हे सर्व मिळून कार्बनडायॉक्साईड उत्सर्जित होतो. खत व्यवस्थापन, भातशेती, जमीन वापर, पाणथळ, बदल, मानवनिर्मित तलाव यामुळे मिथेनचे प्रमाण वाढते, किनवन प्रक्रियेतून मिथेन उत्सर्जित होतो.
पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या भूपृष्ठालागत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यामध्ये 78%नायट्रोजन,21%ऑक्सिजन,0.9%argon,0.03%कार्बन डायॉक्साईड, आर्द्रता, इतर वायू व घटक.
याच वातावरणामुळे पृथ्वीवरील जीवांना संरक्षण मिळते ओझोन मुळे पृथ्वीचे तापमान प्रमाणाबाहेर वाढत नाही, कल्पना करा वातावरण नसते तर काय झाले असते?
आपल्या संरक्षक छत्रीमुळे विनाशकारी प्रारणांचा पृथ्वीवरील सजीवांना उपद्रव होत नाही व पृथ्वीचे तापमान प्रमाणाबाहेर वाढत नाही.वातावरण नसते तर दिवसा पृथ्वी 94℃पर्यंत तापून रात्री -185℃इतकी थंड झाली असती तापमानातील इतका मोठा बदल फरक 
मानव आणि इतर जीवसृष्टीस अपायकारक झाला असता .प्राणांनी सोडलेल्या कार्बन डायॉक्साईड मूळे वनस्पती चे संरक्षण होते, उलट मानव व अन्य प्राण्यांना वनस्पती ऑक्सिजन वायू free फुकट उपलब्ध करून देतात.हवेतील पाण्याच्या वाफेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालागतचे  तापमान नियंत्रित होते,बाष्पउत्सर्जन बहुतकरून वनस्पतींकडून होते.
एखाद्या क्षेत्रातील भूपृष्ठ खूप तापल्यास त्यालागतची हवा उष्ण व हलकी होते आणि वर जाऊ लागते, नंतर मेघनिर्मिती, पर्जन्यासारख्या अनेकविध वातावरणीय अविष्कारांची शृंखला निर्माण होते.
चंद्रावर मात्र वातावरण नसल्याने तेथे अशा प्रकारचे आविष्कार घडू शकत नाहीत.पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे दरदिवशी पृथ्वीबाहेरून येणारे खडकाचे तुकडे(अशनी)सेकंदाला 16km वेगाने पृथ्वीकडे खेचले जातात. त्यांच्या माऱ्यापासून पृष्ठभागाचे व सजीवांचे  संरक्षण केवळ वातावरणामुळे होत असते .आपण मानव मात्र हे वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करतोय.
  ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. ध्रुवीय प्रदेशांमध्ये, विशेषत: अंटार्क्टिकातील हिवाळ्यात स्थितांबरातील (Stratosphere) तापमान खूपच कमी असते. तिथे बर्फकणांचे ढग तयार होतात ज्यांना ध्रुवीय स्थैतांबरिक ढग (Polar Stratospheric Clouds) असे म्हणतात. तिथवर पोहोचलेले सीएफसी ह्या ढगांमध्ये गोठतात. अंटार्क्टिकावर वसंत ऋतूचे आगमन झाले की सूर्याच्या उष्णतेने स्थैतांबरिक ढगांतील बर्फ वितळतो. त्यावेळी मुक्त झालेले अभिक्रियाशील सीएफसी तेथील ओझोनचा प्रचंड प्रमाणात नाश करतात. अशाप्रकारे अंटार्क्टिकावर ओझोन थराला छिद्र पडले आहे.
यावर्षी मात्र corona ,COVID-19 मुळे ओझोन थर बऱ्यापैकी सुरक्षित झाला असावा कारण त्याला पोखरणारी व्यवस्था म्हणजे औद्योगिक कारखाने, वाहने यातून निघणाऱ्या वायूंचे प्रमाण काही महिने तरी बंद होते.निसर्गाने सुद्धा काही महिने त्याच्या सौंदर्याचा निवांत आनंद घेतला असावा.
 मला मात्र ह्या नवीन पिढीचे भारी कौतुक वाटते.माझा मुलगा शाश्वत व त्याचे स्कूलचे मित्र मंडळ मिळून एक गॅंग/group आहे ,😄means about awarness of environment गेल्या 2 वर्षांपासून ही मुले आपापल्या घराच्या बाजूला, रस्त्याच्या बाजूला, रिकाम्या जागेत ,शेताच्या कडेला जाऊन झाडे लावत आहेत, एवढंच नाही तर दर शनिवारी, रविवारी त्यांनी लावलेल्या झाडांना नियमितपणे आपल्या ecofriendly vehicle म्हणजे bicycle वर एक bottle/कॅन जे possible असेल ते घेऊन जातात व त्या वृक्षांना पाणी देतात. केवढा हा awareness त्यांचा पर्यावरणाविषयी,आता तो 8वि ला आहे .जिथे आपल्या मोठ्यांना तुकाराम महाराजांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 'या अभंगाचा विसर पडला तिथे ही मुले आपल्या कृतीतून साध्य करत आहेत.मला वाटते प्रत्येक ठिकाणी असावी असा  एक group.
फ़क्त save tree, save life
पर्यावरण बचाओ, जीवन बचाओ
असे नारे देऊन चालणार नाही, प्रत्यक्ष कृती करावी लागेल तरच आपली पृथ्वी 'सुजलाम सुफलाम 'होईल.
आणि शेवटी काय तर,' जहाँ है हरियाली, वहा है खुष हाली .'
मला ग. दि. माडगूळकरांची आठवण झाली,
ग. दि. माडगूळकरांच्या शब्दात सांगायचे तर
"आई तुझ्या तीर्थावर भरली एकच कळशी,
त्या कळशीच्या तीर्थावर झालो आजन्म पावन,
आई तुझ्या नावाच्या शाखा पारंब्या बांधती इमला,
इमल्यात नांदतील पिढ्यानवर पिढ्या,
जोजावतील संसारा राघू चिमण्या बोबड्या."
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

                       #कुतूहल ओझोनच्या संरक्षक छत्रीचे
                          #कुतूहल ozone चे
                              #save tree, save life
                                 #ozone layer depletion
संदर्भ-ईंटरनेट,पाठ्यपुस्तके,विश्व कोष
      Images-google



                                 @सौ .उज्वला तायडे
                                          अकोट



Comments

  1. छान माहिती आहे. आम्ही लहान असतांना सकाळी लवकर उठून फिरायला जाणं आरोग्यदायक असतं हे मनावर बिंबवण्यासाठी पोक्त लोक सांगायचे की पहाटे ओझोन खाली आलेला असतो. तो फुफ्फुसांमधे भरून घ्या. आता अलिकडे माझ्या वाचनात असं आलं की ओझोन थेट श्वासात आला तर हानिकारक असतो. यावर थोडं लिखाण वाढवावं ही विनंती

    ReplyDelete
  2. ओझोन ची संरक्षक छत्री, उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....