कुतूहल सूर्योदय, सुर्यास्ताला दिसणाऱ्या सुर्याच्या लाल रंगाचे ..🌞
सूर्य सकाळी उगवतो तेव्हा तो एखाद्या लाल गोळ्यासारखा दिसतो. जसजसा दिवस वर येतो तसतसा तो पांढरा दिसतो आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचा रंग परत लाल होतो ,हे असे होण्याचे काय बरं कारण असेल, आहे न कुतूहल.... जाणून घायचे मग.
🌞☀️🌅🌄☀️🌤️⛅🌞🌝☀️🌤️☀️🌞🌝🌞
🌐पृथ्वी सूर्याभोवती🌞 फिरते हे आपल्याला माहीत आहे. पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो त्या भागावर सूर्यप्रकाश पडतो. आणि त्या भागावर दिवस झाल्याचे आपण म्हणतो.
साधारणपणे सूर्योदय होणे म्हणजे सुर्याचे क्षितीजाच्या वर येणे.🌄🌅
सूर्यप्रकाश जांभळा, पारवा, अस्मानी/निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी ,तांबडा/लाल या रंगाच्या एकत्रीकरनामुळे होतो.🌈प्रकाश विभक्त झाल्यानंतर या वेगवेगळ्या सात रंगात होतो. तरंग लांबी हा प्रारणांचा/किरणांचा महत्वाचा गुणधर्म आहे.आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी 400 nm ते700nm च्या दरम्यान असते .यामध्ये तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700nm च्या जवळ असते. सायंकाळी सूर्य जेव्हा क्षितिजाजवळ असतो तेव्हा सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचण्याकरिता दुपारच्या वेळेपक्षा वातावरणातून अधिक अंतर कापावे लागते. हे अंतर दुपारच्या अंतरपेक्षा पन्नासपट अधिक असते.वातावरणात असलेले धूळ, धूर व पाणी पिवळ्या नारिंगी व लाल या रंगव्यतिरिक्त इतर सर्व रंगांना इतस्ततः पसरवितात .या तीन रंगामध्ये लाल रंगाचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे त्यांचे मिश्रण लालसर भासते .यामुळे सूर्योदयाचे व सूर्यास्ताचे वेळी सूर्य लाल दिसतो.
साधारणपणे सूर्यप्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करत असतो.
सूर्याचे विश्लेषण म्हणजे खूप कठीण काम आहे.
पण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज शक्य झाल्या आहेत. चंद्रावर कुणी विजय मिळवणार असं म्हटलं असतं, तर एकेकाळी आपणास पटलं असत का?पण चांद्रयानामुळे शक्य झाले आहे.
पूर्वी सूर्य, चंद्र यांना ग्रहण लागणे याबाबतीत बऱ्याच शंका कुशंका होत्या परंतु आज आपण त्याकडे एक खगोलीय घटना म्हणून बघतो.
या खगोलीय घटनेचा आंनद आताच 21 जून ला घेतला ,अतिशय सुखद घटना होती सुर्यग्रहणाची.
एकूणच ग्रहण म्हणजे काय तर अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा खेळ.म्हणजे काय तर एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूला झाकते तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात.
शाळेत असताना मात्र ग्रहना ची व्याख्या कधीच कळली नव्हती.😀
जेव्हा सूर्य-चंद्र-पृथ्वी ☀️🌙🌐 साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण अमावस्येला होते.
नुकत्याच डोळ्यांनी सूर्यग्रहण बघणे कोनाचसाठी चांगले नसते ते बघण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चष्मे, दुर्बिणीने बघता येते.प्रत्यक्ष बघितले तर डोळ्यांना इजा होऊ शकते.पृथ्वी आणि चन्द्र यांच्या अवाढव्य सावल्यामुळे ग्रहण घडून येतात.
सूर्य हा ज्वलनशील वायूचा एक तप्त असा गोळा आहे.त्यावर सतत वादळे होतात त्यावरील काही भागांचे तापमान कमी होते. दुर्बिणीने पाहिले असता काळे डाग दिसतात त्यालाच सौरडाग म्हणतात.जसे चंद्राला खळे पडते तसे सूर्याला देखील पडते परंतु त्याच्या प्रखरतेमुळे आपण ते पाहू शकत नाही.
अभ्यासाला सूर्य तसा खूप छान तारा आहे, मला खूप आकर्षन आहे त्याचे.आपल्याला माहीतच आहे की सूर्य आहे म्हणूनच तर पृथ्वीवर जीवसृष्टी आहे.
शास्त्रज्ञांच्या मतानुसार सूर्याचा जन्म 4.5अरब वर्षापूर्वी झालाय.सूर्य हा hydrogen आणि हेलियम पासून बनलेला गोळा आहे.आणि nuclear fusion या process मधून प्रचंड प्रमाणात आपल्याला उर्जा मिळते.
पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणून शास्त्रज्ञांनी सूर्याचा अभ्यास केला.सूर्य त्याचे hydrostatic हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून असल्याने तो प्रसरण किंवा आकुंचन पावत नाही.सूर्यप्रकाशात अनेक जीवशास्त्रीय गुणधर्म आहेत.सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात त्यामुळे ही जंतुनाशक म्हणून वापरली जातात.या किरणांमुळे त्वचा जळू शकते पण हीच uv rays' ड' जीवनसत्व बनविण्यासाठी आवश्यक असतात.सुर्यकिरणांचे अक्षांशा नुसार प्रमाण बदलत असल्याने पृथ्वीवर अनेक प्रकारचे जैवविविधता आढळून येते,तसेच मनुष्याच्या त्वचेच्या रंगातही हवामानानुसार विविधता आढळते.ज्यांना निसर्गाविषयी, त्यातील घटनांविषयी कुतूहल वाटते ते सर्वच या निसर्गातील खगोलीय घटनांचा आनंद घेतात. एखाद्या पर्यतनस्थळी, हिलस्टेशन ला जाऊन निसर्गातील अवर्णनीय घटनेचा आनंद लुटतात, आणि तो घ्यायलाच पाहिजे .सूर्य हा आपल्या सर्वांसाठी कधीही न संपणारा असा ऊर्जास्रोत आहे.
दररोज जास्त नाही पण 12 जरी सूर्यनमस्कार सूर्योदयाच्या वेळी काढलेत तरी भरपूर झाले.
सूर्योदयाच्या लाल रंगाचे कुतूहल अनुभवायचे असेल तर मात्र पहाटे लवकर उठावे लागेल.
"Keep your face to the SUN and you will never see the SHADOW"
"What sunshine is to flowers,smiles are to humanity"
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
#कुतूहल सूर्योदय, सूर्यास्ताचे
#कुतूहल सूर्याच्या लाल रंगाचे
#sunrise#sunset
#कुतूहल सुर्याच्या सूर्योदय, सूर्यास्ताच्या लाल रंगाचे
@उज्वला तायडे, अकोट
Good information
ReplyDeleteछान लिहिलंय...
ReplyDeleteखूपच माहितीपूर्ण लेख. मांडणीसुद्धा आकर्षक आहे.
ReplyDelete