कुतूहल जास्त oxygen देणाऱ्या झाडांचे....

 🌱🌲🌳🌴🌵🌿🌾🍀☘️🌿🌵🌴🌳🌲🌱                          
सर्वसाधारणपणे सर्व झाडे रात्रीच्या वेळी वातावरणात कार्बनडायॉक्साईड सोडतात ,मात्र काही झाडे ऑक्सिजन उत्सर्जित करून पर्यावरणास हातभार लावतात पाहूया नेमकी कोणती आहेत ही झाडे. 
कारण आता covid-19,corona मुळे शरीरातील ऑक्सिजन lavel ला जास्त महत्त्व आले आहे.
                                  आपल्याला आपलाच निसर्ग वाचवण्यासाठी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्याची आवश्यकता पडते. आहे की नाही "कुतूहल".
दरवर्षी देशभर झाडे लावण्याचा सोहळा वनमोहोत्सवाच्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी लाखों रोपं लावली जातात पण ती सगळी जगतातच असे नव्हे.
निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो.
    मानवाच्या सुखासीन जीवनशैलीमधून, रुजू लागल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागल्याने निसर्ग संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव सर्वांच्या मनात ठसविणे गरजेचे बनले. वस्तू आणि संसाधनांचा पुनर्वापर केल्यानेही खूप चांगला फरक पडतो असेही दिसून आले आहे.
माझा शाश्वत लहान असताना त्याची poem घरभर पळत म्हणायचा 'झाडे देतात फुले, झाडे देतात फळे,झाडांमुळेच आपणास ऑक्सिजन ही मिळे',खरंच,
निसर्ग महान आहे .निसर्गातील सर्वच झाडे आपल्याला oxygen म्हणजेच प्राणवायू देतात, पण त्यातील काही झाडे तर चक्क जास्त oxygen देतात ,आहे की नाही "कुतूहल".
आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ऑक्सिजन तयार करण्याचं काम झाडांची पाने करतात त्यांच्या श्वसन प्रक्रिया मधून .पिंपळाच्या झाडाचा विस्तार आणि उंची सर्वाधिक असते .पिंपळाचे झाड दिवसातून 22तासापेक्षा जास्त वेळ oxygen देते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही पिंपळाचे झाड खूप उपयोगी मानले जाते. सर्वसाधारणपणे झाडे दिवसा oxygen आणि रात्री Co2कार्बनडाय ऑक्साईड सोडतात. या झाडाच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीची प्राणशक्ती वाढते .पिंपळाच्या झाडाप्रमाणेच कडुनिंब, वड, उंबर, तुळस झाडे जास्त oxygen देतात.
बांबूचे झाड सर्वात लवकर वाढणार झाड आहे ,बांबूचे झाड हवा fresh करण्यासाठी फायदेशीर ठरते. बांबूचे झाड इतर झाडांच्या तुलनेत 30%अधिक प्रमाणात oxygen तयार करत.
कोरफड, रूई, जट्रोफा,Areca palmअश्वगंधा, निवडुंग चे काही प्रकार ही झाडे वाहनांमधून वायू शोषून परिसर स्वच्छ ठेवतात.planktons जगाला80%oxygen देतात. Areca palm घरात लावल्यास हवा शुद्ध राहते, snake plant पण हवेतील विषारी वायू जसे formaldehyde, nitrogen oxide(NO),benzene, xylene आणि trichloroethelene हे शोषून oxygen देतो. बांबू पण हवेतील tolune शोषून,  जो की विषारी असल्याने  नाक, डोळे, घसा यांची जळजळ होते   ते दूर करतो. तुळस हवेतील कार्बन मोनॉक्साईड(CO),कार्बन डायॉक्साईड(CO2),सल्फर डायॉक्साईड(SO2) शोषून घेते. आणि विपुल प्रमाणात ऑक्सिजन देते.
काही orchid सुद्धा हवेतील झायलीन शोषून रात्री ऑक्सिजन उत्सर्जित करतात.

अस म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते पण दोन्ही ,नाक आणि तोंड बंद केले  की जीव गुदमरतो कारण oxygen मिळत नाही, मेंदूला रक्तपुरवठा होत नाही.
हवेतील ऑक्सिजन अपुरा पडतो. तो फुकट मिळतो म्हणून त्याची किंमत करत नाही.
वातावरणात 21%इतका oxygen असतो .
हिरव्या वनस्पती आपल्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मध्ये स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायॉक्साईड co2 वापरतात आणि आपल्यासाठी ऑक्सिजन वायू वातावरणात सोडतात ,तेही फुकट.परंतु वाढत्या प्रदूषणामुळे शुद्ध स्वरूपातील oxygen मिळणं कठीण झालंय.
औद्ययोगि  क्रांतीनंतर  ऑक्सिजन चा वापर  जास्त
वाढत आहे.निसर्गतःच वातावरणातील oxygen ची पातळी वाढली जाते.परंतु पृथ्वीवरील ऑक्सिजन च्या  आच्छादनात म्हणजेच वनस्पतींची  घट झाल्याने  ऑक्सिजन च्या पुनर्निर्मिती मध्ये असंतुलन झाले आहे.वातावरणातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होणे ही एकूणच संपुर्ण मानवजातीसाठी आणि सर्व सजीवसाठी गंभीर समस्या आहे.
 आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्यासारखी स्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने... सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम थोड्याच वर्षात वापरकर्त्याला म्हणजे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. 
वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत.
झाडे मानवाला ऑक्सिजन देण्याचं काम करतात .मानव अन्नाशिवाय, पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो परंतु oxygen शिवाय थोडा वेळ सुद्धा जगू शकत नाही. आणि आता या corona, COVID 19मध्ये तर oxygen lavel वाढवण्याची नितांत गरज आहे. म्हणून आपण आपल्या घरात आणि सभोवताली जास्त ऑक्सिजन देणारी झाडे लावली पाहिजेत.
जास्त शक्य होत नसेल तरीपण एखादे तरी जास्त ऑक्सिजन देणारे झाड लावलं पाहिजे.
एका कुटुंबातून एकतरी झाड लाऊन त्याचे जतन केले तरी याचा पर्यावरणावर चांगला परिणाम होईल.
"अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायू चा होईल कळस"
तुका राम महाराज यांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे "वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे"
🌱🌴🌲🌳☘️🌱🌴🌲🌳☘️🌿🌵🌾🌴🌱

#कुतूहल  ऑक्सिजन देेनाऱ्या झाडाचे
# oxygen giving plants
#tulsi#aloe vera#money plant#orchids#कडुनिंब#वड#पिंपळ#areca palm#snake plant#gerbera#bamboo plant
            संदर्भ-माहिती इंटरनेट,विश्व कोष
              काही चित्र-इंटरनेट

                               @ujwala tayade,Akot

Comments

  1. उपयुक्त माहिती , छान सांगड घातली

    ReplyDelete
  2. Nice massage of. .. Grow ur garden with more oxygen giving plants. . .reduce pollution.. .and make our lungs healthy. .

    ReplyDelete
  3. Nice massage to make healthy atmosphere

    ReplyDelete
  4. कुतूहल ज्यास्त ऑक्सीजन देणाऱ्या झाडांचे, ऑक्सिजन हा आपणास झाडापासून मिळतो हि खरोखर कुतूहलाचा गोष्ट आहे .
    परंतु आज विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून निसर्गाने फुकट दिलेले
    वातारण मानवाने नष्ट करण्याचा ध्यास
    घातला आहे.
    म्हणूनच भारत सरकारने १९८० च्या वन कायद्या नवे वनाचे सवर्धन केले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....