कुतूहल जंगलाचे देणे रानभाज्यांचे.........
पावसाळा सुरू झाला की या रानभाज्या जंगलात/रानात कोणत्याही मेहनती शिवाय आपोआप उगवतात सध्याच्या organic food च्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या
अर्थाने organic food असतो.त्यांना कोणत्याही कीटकनाशक, खत दिलेले नसते.पूर्णपणे नैसर्गिक रीतीने ,पध्दतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातील एक पर्वणीच आहे.
त्या दिवशी घरी परतत असताना कामानिमित्त गाडी घेऊन बाजारातून आले असता एक मुलगा जोरजोरात आवाज देऊन ओरडून म्हणत होता जिवतीची फुलं विसचा पंधरा ला 1 गंज(bunch) घ्या मॅडम,60चे 4 गंज घ्या, आधीच पाऊस पडत असल्याने अंगात तो raincoat ,आजूबाजूला भरपूर वाहनांची गर्दी, त्याला म्हंटले 100ला दे. माझ्याकडे चिल्लर नाही.
तो नाही म्हणाला माझ्याकडे4च आहेत ते 60 ला घ्या, असू दे .म्हणून त्याच्या हातात 100रुपये दिले. मला पावसात गाडी हातात घेऊन त्रास होत होता, त्यातल्या त्यात पिशवी सोबत नसल्याने फुले ठेवायची कुठे हा देखील प्रश्न होता. त्याला त्याच्याजवळ असलेली पिशवी दे म्हंटले तर तो म्हणाला माझेकडे paper होते पण पावसानं भिजले म्हंटले तुझे ते पोते तरी दे ,जीर्ण झालेले कळकट असलेले होते ते, लगेच बाजूला असलेली म्हातारी म्हणाली तुला पोत दिलं तर उद्या कश्यात आणणार तो फुले, म्हंटलं पैसे परत नका देऊ40रुपये पोत्याचे घे. कर टू ले घेवून बसली होती ती,तिने विचारले भाजी येते का याची करता तिच्याकडे भरपूर रानभाज्या होत्या ,मला मात्र त्यातील1च जिवंतीची फुले च करता येते होती ,आईकडून शिकले होते मी ती reciepe माझ्या सर्वात आवडीची रानभाज्या मध्ये असणारी जिवतीची ,ओंजळीत घेतली की छान सुगंध येतो त्यांचा .तिच्या जवळचे कार्टुले, दिले घे आता हिशेब बरोबर झाला, नको म्हणताना जबरदस्तीने दिले तिने .माझा नातू आहे तो सांगत होती ती.
एवढ्या पावसात ओले होत त्या मुलाने गाडीच्या डिक्कीत भराभर फुले टाकून दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा परत येताना न चुकता त्या आजीकडून भरपूर रानभाज्यांची recipe, माहिती मिळवली आणि घरी असलेले जुने newspaper दिले.
भरपूर रानभाज्यांची नावे माहिती झाली ,जसे आघाडा, करटोली/कार्टुले,कटुरले,तोंडले, कुरडू, दिंड, भारंग,अळू, सुरण,फांदी, मायाळू, आंबूशी,भुईआवली, तरो टा,टाकला ,शेवगा, अंबाडी, हातगा(अगस्ती),वाघाडा, आणि इतर खूप,भरपूर भाज्यांची माहिती झाली.बांबूचे कोंब ,असे म्हणतात आकाशात जेव्हा विजा कडकडाट करतात तेव्हाच बांबूचे कोंब निघतात. अतिशय चविष्ट असे बांबू च्या कोंबचे लोणचे होते.
जंगललगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरि क अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात ऋतुमानानुसार त्यांना ह्या भाज्या सहज उपलब्ध असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते .तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे.आणि त्याविषयी चे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहज पोहोचते या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते काही विशिष्ट दिवशी, तर काही सणाला करतात.यावरून त्यांची निसर्गाशी असलेली नाळ अधोरेखित होते.सोबतच रानभाज्या मध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म देखील असतात. आणि आता तर त्याची नितांत गरज आहे.
मला आवडलेली जीवनतीची फुले सहज म्हणून status लावली ,एका मैत्रिणीचा फोन आला म्हणाली कसली ग ही फुले ,मला तर duty वर officeला जाताना हल्ली रोज दिसतात बाजारात ही फुले, मला वाटलं कोणत्या देवाला वाहतात ही फुले🤔.म्हणून म्हंटले चला सगळ्यांनाच ओळख करून देऊया या जंगलाच्या देण्याची/मेव्याची.
भरपूर गुणकारी असलेल्या ह्या सर्व रानभाज्या करण्यासाठी अगदी सोप्या आणि रुचकर असतात.
नैसर्गिक पध्दतीने उगवल्या असल्याने आरोग्यासाठी चांगल्या असतात .त्यामुळे पावसाळ्यात येणारा हा रानमेवा अजिबात चुकवू नका.पुढच्या वर्षी बाजारात जाल तेव्हा न चुकता रानभाज्या जरूर आना.यावर्षी तर आवर्जून आणाच.
आहे न ह्या जंगलाच्या देण्याचं रानभाज्या नचे" कुतूहल".
🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️🌱
#कुतूहल रानभाज्या चे
#रानभाज्या
#जंगलाचे देणे
#organic food
#जिवतीची फुले
@उज्वला तायडे
4ऑगस्ट20
रानमेवा मस्तच टॉपिक निवडला ग। नवीन भाज्या पण माहीत झाल्या। thanks g
ReplyDeleteछान माहिती मिळाली रानभाज्यांची
ReplyDeleteछान माहिती मिळाली रानभाज्यांची
ReplyDeleteVery informative
ReplyDelete