"कुतूहल "सुरवंटा च्या रंगबिरंगी फुलपाखरांचे....🦋


दरवर्षी पावसाळ्याच्या सुमारास आपणांस फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व चित्रविचित्र नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फ़ुलांवरून त्या फुलावर स्वच्छन दपणे उडताना आढळतात.सर्वांनाच आकर्षित करतात.
फुलपाखरांच्या रंगीत व मनोहर पंखामुळे हे कीटक उडताना लहानथोरांचे लक्ष आपणाकडे सहजतेने आकर्षून घेतात.
काल, परवाची गोष्ट आहे, माझा मुलगा शाश्वत mobile मध्ये फुलपाखरू त्याच्या कोशातून बाहेर पडण्याची shooting /videoकाढून तो आनंदी क्षण अनुभवत होता, मला सुद्धा घरातून अंगणात आणून तो क्षण टिपणाचा आग्रह करत होता,म्हणत होता thanks to nature. I am so lucky, I will get to see an adult butterfly emerge.
मुलांची सृजनशीलता व पर्यावरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यांना बळकटी येणेही महत्वाचे आहे. कीटकांची नैसर्गिक रचना कशी असते हेही त्यांना कळायला हवे.
"असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी"याप्रमाणे जर आवड असेल तर या अडचणींवर मात करता येते.
पर्यावरणाबाबत भान वाढीस लागणेही आजची आत्यंतिक गरज आहे. कोणत्याही वयोगटातील माणसे ह्यास अपवाद नाहीत ही जाणीव खरेतर लहानपणापासून वाढीस लागायला हवी.
    फुलांची बाग ही नेहमीच सुंदर दर्शनीयअसते. त्याकडे फुलपाखरे व इतर किटकही आकृष्ट होतात. परागन करण्यासाठी ते उपयोगी पडतात. फुलांकडे वेगवेगळे कीटक उदा. फुलपाखरे, भुंगे, पतंग इ. तसेच पक्षी, प्राणी आकृष्ट होतात.विविध प्राण्यांचे जीवनक्रम वेगवेगळ्या प्रकारचे असतात, हे देखील मनोरंजकच आहे, त्यातही 'कुतूहल 'आहे.
जसे कुत्रा, मांजर हे प्राणी त्यांच्यासारखीच दिसणारी पिल्ले जन्माला घालतात.
कोंबड्या इतर पक्षी अंडी घालतात ही पिल्ले त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी असू शकतात. पण फुलपाखरांचे काय?फुलपाखरांच्या किटकांची पिलावळ व फुलपाखरे यामध्ये काडीचेही साम्य नसते.
बहुतेक सर्व कीटक अंड्यातून जन्माला येवून विविध जीवनावस्थेतून जातात. या प्रक्रियेला अवस्थांतर म्हणतात. काही कीटक 3 टप्प्यातील अपूर्ण अवस्थांतर प्रक्रियेतून जातात. कसर, झुरळ, नाकतोडा, पतंग, ऊ, हे कीटक अंडे ते प्रौढवस्था अश्या अवस्थेतून जातात. तर फुलपाखरे ,पतंग, मुंग्या, मधमाश्या, गांधीलमाश्या, भुंगे हे कीटक अवस्थांतर च्या पूर्ण प्रक्रियेतून अंडी, अळी, कोष, प्रौढअवस्था या 4 टप्प्यातून जातात.
प्रौढावस्थेतील कीटकांचे रूप अगदी वेगळे असते आणि खाद्यही वेगळ्या प्रकारचे असते.
Common mormon किंवा lime फुलपाखरे आढळण्याची हमखास जागा म्हणजे कढीलिंबाची किंवा लिंबाची रोपे. पानाच्या मध्यावर असलेल्या अळ्या पक्ष्यांच्या ताज्या विष्ठेप्रमाणे दिसतात. पतंगांचे सुरवंट पावसाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात आढळून येतात.फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक किटक आहे. फुलपाखरे मिशांनी वास घेतात तर पायाने चव ओळखतात .आहे न कुतूहल.
सर्वच किटकांमधील आकर्षक कीटक म्हणजे 'फुलपाखरू'.🦋
'फुलपाखरू छान किती दिसते,गोड किती हसते '.
'फुलपाखरू झालो रे मी ,फुलपाखरू झालो' .....
हे बालगीत लहानपणी रेडिओ वर ऐकले की फुलपाखरांचे खूप  कुतूहल वाटायचे ,आपणही त्यांच्यासारखे या वेलीवरून त्या वेलींवर उडावेसे वाटायचे .🦋🌼🦋🌼🦋🌼🦋🌼🦋🌼🦋
फुलपाखरांचे इंग्रजी नाव 'butterfly'तरी फुलपाखरू माशी नाही बरं. कदाचित फुल आणि फूलपाखरू यांचा घट्ट संबंध असावा असे या नावावरून वाटते .मात्र सगळी  फुलपाखरे फुलांवर बसत नाहीत. काही फुलपाखरे चिखल, शेण, ओली माती ,वनस्पतींनी पाझरलेला द्रव व मलमूत्र यांच्याकडे देखील आकर्षित होतात. बहुतेक फुलपाखरे वनस्पतींच्या फुलांतील मकरंद शोषून घेतात. प्रत्येकाला वाटते फुलपाखराला हात लावावा, पंखांना हात लावला असता धुरळ्या सारखे  लहान रंगीत कण लागतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता हे कण बारीक चपट्या खवळ्यांसारखे दिसतात. फुलपाखरांचे मोहक आकर्षक रंग  खवल्या मधील रंगद्रव्यामुळे  किंवा त्यातील हवेच्या पोकळ्यामधून होणाऱ्या प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे दिसतात. त्यांच्या काही जातींमध्ये ऋतुमानानुसाररंगात  बदल होतात .त्यांच्या पंखांचे उर्ध्व बाजूचे रंग गडद तर अधर बाजूचे रंग मंद किंवा फिकट असतात.
काही फुलपाखरे साधारणतः वर्षभर जगतात. बहुसंख्य फुलपाखरे त्यांच्या अळ्यांना ज्या वनस्पतींपासून योग्य अन्न मिळेल अश्या वनस्पतींच्या पानांवर अंडी घालून मरून जातात. वाढ होत असताना अळ्या चार वेळा कात टाकतात आणि आकाराने मोठया होत जातात.
चौथ्यांदा कात टाकल्यानंतर अळीचे कोशात रूपांतर होते, शेवटी प्रौढ फुलपाखरू बाहेर येते.🦋
काही पतंगांचे सुरवंट आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार काडीभोवती किंवा मातीत कोश तयार करतात.
"जीओ जीवस्य जीवनम"या निसर्गाच्या मुलतत्वानुसार अन्नसाखळीमध्ये हे प्राणी इतरांचे भक्ष्य ठरतात तर ते स्वतः इतर हानीकारक किटकांवर उपजीविका करतात .अशा रितीने जैविक कीटकनियंत्रण होवून निसर्गात समतोल राखला जातो. आहे न ह्या संतुलणाचे कुतूहल.
आपण ही सुरवंटा चे फुलपाखरू अनुभवण्याची प्रक्रिया अनुभवू शकतो.
एक रुंद तोंडाची पारदर्शक बरणी घेवून तिला झाकण्यासाठी पातळ कापड, दोरा/रबर ब्यान्ड आणि किटकांसाठी खाद्य आवश्यक असते. प्रत्येक प्रकारच्या अळीचे खाद्य वेगळे असल्याने अळी गोळा करण्यापूर्वी त्या अळीचे खाद्य कोणते आहे याबद्दल माहिती करून घेणे महत्वाचे असते. काही कीटक आणि त्यांच्या अळ्या  विषारी पण असतात बरं.
बरणीत अळ्या ठेवण्यासाठी, त्यांना हालचाल करण्यासाठी, खाण्याची पाने ठेवण्यासाठी पुरेशी जागा हवी .सुरवंटा चे/अळीचे कोशात रूपांतर होण्यासाठी थोडी वाट पहावी लागते. साधारणतः 12ते15दिवसांचा कालावधी लागतो. आणि ज्या दिवशी tranparent पारदर्शक कोशातून फुलपाखरांच्या पंखांचे रंग स्पष्ट दिसायला लागतील तेव्हाच साधारणपणे दुसऱ्या च दिवशी फुलपाखरू कोशातून बाहेर पडते......🦋
बागेमध्ये रानटी फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड केल्यास फुलपाखरे ,मधमाश्या, व कीटक त्यावर आकृष्ट होतील.
आहे न सुरवंटा च्या फुलपाखरांचे "कुतूहल".
🦋🌼🥀🌷🌸🌺🏵️🌹🦋🥀🌷🌼🌸🦋
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
                     संदर्भ-मराठी विश्वकोश,
                                पाठ्यपुस्तके
                        काही चित्र-इंटरनेट वरून
#कुतूहल सुरवंटा च्या फुलपाखरांचे
#फुलपाखरू
#Butterfly
#फुलपाखरांचे जीवनचक्र

                 @उज्वला तायडे

Comments

  1. I like read your blog...because it's so informative dear

    ReplyDelete
  2. Detail information about butterfly. Mast ...

    ReplyDelete
  3. Detail information about butterfly. Mast ...

    ReplyDelete
  4. असेल दृष्टी,तर दिसेल सुष्ट्री सुंदर विश्लेषण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....