मुरांबा मैत्रीचा .............एक कुतूहल....
मैत्री चा मुरांबा आहे न "कुतूहल".खरोखरच आता मैत्री चा मुरंबा झाल्यासारखे वाटत आहे.मुरांबा/मुरंबा/मोरावळा मुरल्यानंतर त्याची गोडी आणखी वाढू लागते, आणि खरं म्हणजे त्या मुरंब्यांनी आजार बरा होतो.
मित्र/मैत्रीण म्हणजे आपल्यासारखाच असणारा परंतु दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला एक जीव.
मैत्री तशी खरी तर शाळेमध्ये असतानाच रुजते.
आज सुरेखा आणि माझ्या मैत्रीला 27 वर्षे झालीत .
11वि ला प्रवेश केल्यानंतर सर्वच नवे, नवे चेहरे ,वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्वच,त्यात ती मला आपलीशी वाटली आणि मी अलगदपणे माझी मान विश्वासाने तिच्या खांद्यावर टाकली. तिथपासून सुरू झाला मैत्रीचा प्रवास ,पुढे 12वि, Bsc, Msc, सर्वच 1च बाकड्यावर (bench).वर .अगदी रूममध्ये दररोज चा चहा बनवण्यापासून ते माझी प्रत्येक दिवशी वेणी घळण्यापर्यंत ,आणि मेस मध्ये जेवण चांगले नसले की रूममध्ये काहीतरी बनवून खाऊ घाळलेपर्यंत लाड पुरवलेत माझे ,शिवाय प्रवासात माझे डोके तिच्या मांडीवर ठेवून मला त्रास होऊ नये म्हणून.आणि आता profesionaly सुद्धा एकाच ठिकाणी, त्यामुळे प्रत्येक, training, workshop, science exhibits, मुलेही एकाच school मध्ये म्हणजे मग parent meetings मुलांच्या school च्या mother साठी च्या competions ,online zoom meetings,सतत भेटी होतात,किंबहुना वेळ काढून ठरवून भेटी घेतल्या जातात, shopping सुध्दा सोबतच, विशेष म्हणजे साडी shopping तुम्हांला सांगते' साडी'हे भारतातले एक अजब वस्त्र आहे, की ज्या वस्त्राच्या मोहापोटी कितीतरी shopping सोबत केली जाते. मग ते घरी कपाट उघडल्यावर त्या साड्या अंगावर पडून जणूकाही लूट झाल्या सारखे वाटते.
खरोखर मैत्री काय असते हे hostel ला असताना कळले.तेव्हा hostel ला असताना कुणी hostelers म्हटले की राग यायचा, आता वाटते की मैत्रीचे सुंदर नाते त्या hostel मधेच जास्त दृढ झाले आणि आता त्या मैत्रीचा मुरांबा झालाय खरा.
प्रत्त्येकीची वेगळी identity होती, सुरेखा,उज्जू, ज्योती,कुसुम, सिंधू,पूनम,संध्या,स्मिता, सूची, सत्त्यश्री,दीपा, सीमा,all hostel girls ..........कीती नावे घेणार. whats app, facebook मुळे अजूनही सर्वच connected आहेत.
Hostel ला असताना साजरे केलेले उत्सव, वाढदिवस, होळी............
प्रत्येक eventla केलेली धमाल ,एकत्र बघितलेल्या movies,31st,1st jan, welcome,inaugural function ,निरोप समारंभ सगळंच कस छानच होत.
काहींचे आवाज खूप गोड जसे सिंधू ,जबरदस्तीने तिला म्हणायला लावलेले गाणे. मला मात्र सर्व जणी मिळून भेसूर लावून म्हटलेले गाणे अजूनही आठवतात.
रात्री roomwar 12 वाजता सर्वांचा चिवडा एकत्र करून साजरे केलेले bday .
Adjustment काय असते हे hostel girl मैत्रिन्नींमुळे शिकता आले.
उज्जू आणि मी आम्ही 10 वर्षांपासून 1च colony मध्ये राहतोय त्यामुळे काहीच अशी उणीव भासत नाही, तिने मला 7वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला दिलेला अमर वेल अजूनही दरवर्षीप्रमाणे बहरात असतो त्याला मी मैत्रीचा वेल च म्हणते त्या दिवशी friendship day सुध्दा होता ,मैत्री दिवसाची आठवण म्हणून आम्ही त्याला मैत्रीचा वेल म्हणतो, कितीही सुकला, बांधकाम, ऊन असले तरी देखिल तो वेल दरवर्षी छान फुलतो, तो वेल ही मैत्रीची साक्ष देतो.
खूप काही शिकलो hostel मध्ये
प्रेम+काळजी+भय+मदत+भांडण+जीवन=मैत्री
मैत्रीचं नातंच खूप वेगळं आहे, त्यात no formalities, on any सोपस्कार only निखळ आनंद ,आणि बांधनापलीकडे असणारे एक नाते म्हणजे मैत्री. In short मैत्री एखाद्या फुलाप्रमाणे असते फक्त तिच्या पाकळ्या अलगद कश्या जोडून ठेवता येतील ह्याचा प्रयत्न केला पाहिजे.लांबचा पल्ला गाठायला,दूर दूर जायला, ठेच लागताना सावरायला,चुकीच्या वाटेवर जाताना आवरायला,विविध प्रश्नांची कोडी/कोंडी सोडवायला हवी असते ती मैत्री.
मग ते collage मधून desection करण्यासाठी म्हणून गायत्री सोबत zoology lab मधून चोरून आणलेला pila, scoliodon असो किंवा उमासोबत botany lab मधून आणलेला slides असो. पुढे Msc ला पूनम,मेघा, प्रसन्न सोबत organic chemisyry lab मधून आणलेला conical flask/RB flask फक्त रूममध्ये flowerpot करायला.
Bed असताना खूप सारे पुस्तके तत्वज्ञान, सोसियलॉजिच्या पुस्तकांशी झालेली मैत्री योगी,सपना, शीतल ,सुमा सोबतची unforgatable मैत्री अजूनही आठवते.........
मला पु. ल. देशपांडे यांच्या काही ओळी आठवतात
मैत्री एक सोपी व्याख्या आहे.....
'रोज आठवण यावी असे काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढच कशाला रोज बोलणं व्हावं
असं हि काही नाही;
पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री,
आणि तुला याची जाणीव असणं
ही झाली मैत्री,'
शेवटी काय हो
भेटी नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्वाचं.ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातील
माणूसपण जाणलं............
अशा सगळ्या मित्र/मैत्रिणी ना माझ्या शुभेच्छा
ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या....
आयुष्य खूप सुंदर आहे.
माझेकडे आहे मैत्रीचे टॉनिक सुरेखा, सतत माझ्यासोबत असते,प्रत्येक eventla . सगळ्या्नजवळ मैत्री चे brain tonic असले पाहिजे,कोणत्याही समस्या मैत्रीण ला share केल्याने चुटकीसरशी सुटतात.
प्रत्येकाकडे असावा हा मैत्रीचा मुरांबा, म्हणजे जीवनाचा प्रवास सहज, सुलभ होतो, आयुष्य ही वाढते. आहे न कुतूहल मुरंब्याचे.........
म्हणून वाटते मनामध्ये असू द्यावा कुठेतरी एक कप्पा म्हणजे हवे तेव्हा मारता येतात दूर गेलेल्यांशी गप्पा.
#कुतूहल मैत्रीचे
#happy friendship day#
#brain tonic मैत्रीचे
Aj maitricha arth ajun khol war samjla...
ReplyDeleteWell penned dear👍
DeleteKhup chhan g . .
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमराठी तून आपल्या भावना जास्त चांगल्या प्रकारे मांडू शकतो
ReplyDeleteखूपच छान hostel च्या आठवणी ताज्या झाल्या
ReplyDeleteWaw , sunder friendship
ReplyDeleteखुप सुंदर वर्णन केलय ऊजू.. ही मैत्री अशीच बहरत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ReplyDelete