Time management दहा वाजीचे moss rose/portulaca grandiflora चे .........कुतूहल

आज खूप कुतूहल वाटत होते अंगणातल्या त्या moss rose/portulaca grandiflora चे .कसे बरे जमत असेल हिला अगदी वेळेवर 10 म्हणजे 10 ला च उमलायला ,एवढ्या lockdown च्या काळात काम सगळी अगदीच संथ गतीने होत असताना मात्र हिने हिचा 10 वाजता फुलण्याचा गुण काही सोडला नाही. म्हणून मी तिला आज उचलून top च्या position ला म्हणजे मला माझ्या kitchen च्या खिडकीतून दिसेल अश्या ठिकाणी नेऊन ठेवली तिची कुंडी. कसे बरे जमत असेल तिला time management आहे की नाही 'कुतूहल'.
                अंगणात उमललेली रातराणी, निशिगंध, मोगरा, मधु मालती, जाई, जुई, चमेली,आणि प्रचंड fragrant असलेली ती रान जाई ह्या उमललेल्या म्हणजे सर्वांना त्यांच्या सुगंधाने मोहवून टाकतात. सर्वांनाच त्यांना ओंजळीत भरून घेण्याचा मोह आवरता आवरत नाही.हया सर्वांना proove करून दाखवण्यासाठी तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी भरभरून फुलते. म्हणूनच की काय मला वाटते 10 वाजी moss rose खूप मोठया प्रमाणात फुलते. मला  मात्र तिच्या फुलण्याचे नेहमीच "कुतूहल" वाटते.
मला चंद्रशेखर गोखले ह्यांची चारोळी अजूनही आठवते
"उमलन आणि फुलणं
यात बरंच अंतर आहे
उमलन अगदी स्वाभाविक आहे
फुलण त्या नंतर आहे".
खरोखर हिचे फुलने म्हणजे उमल्यानंतर चे फुलणे आहे.
खरोखर बाकीची फुले लवकर उमलून लवकर कोमेजून जातात.(सर्वच नाही, काही जसे प्राजक्त)
सगळी सुगंधी फुले जितक्या वेगाने वातावरण सुगंधी करतात तितक्याच वेगाने ती कोमेजून सुद्धा जातात. ही मात्र आपण बाहेरून आल्यावर आपल्या चेहरा त्या सुकलेल्या मेथी ,पालक, चवळी च्या भाजीसारखा दिसत असला तरीही तिच्या त्या प्रसन्न फुललेल्या फुलांकडे बघितले की आपली सुद्धा  मरगळ तितक्याच वेगाने निघून जाते.
काय perfect timing असते न 10वाजी चे! तिचा पूर्ण पूर्ण फुललेला चेहरा(फुल) बघितले की घड्याळात न बघता जाणीव होते ड्युटीवर निघायचे म्हणून ,10.15 ला घरातून बाहेर निघताना माझी सर्वच गडबड जणूकाही ती न्याहाळत असते केवढी ती तारांबळ ,टिफिन, bottle, raincoat गाडीच्या डिक्कीत टाकताना त्यातही goggle /मोबाईल विसरले असता परत आल्यानंतर gate बंद करताना 10वाजी चा हसरा चेहरा बघून एक वेगळीच उर्मी येते ,आपल्याला सुद्धा हिच्यासारखे  time management  जमले पाहिजे असे वाटते, आणि मग नकळत पणे घरातून निघताना जसे मुलं bye करतात तसेच हात उंचावून तिच्याकडे बघून bye केल्या जातो.
मला तर हिला "TIME FLOWER"/10 , O Clock flower च म्हणावेसे वाटते.🕙.
आहे न कुतूहल 10 वाजी चे I mean moss rose/portulaca grandiflora चे .आहे का तुमच्याकडे हे plant नसेल तर time management साठी नक्की लावा अंगणात ,सुगंध नसला म्हणून काय झालं तिच्या अस्तित्वाचा सुगंध बरंच काही सांगून जातो.
🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙
🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙🕙
#10 वाजी
#moss rose
#portulaca grandiflora
#moss rose purslane
#Time management plant
#10,0 clock flower
#Time flower

Comments

  1. I like ur natural talent of seeing the optimistic, good side of everything be it snakes or rose moss. I recommend we all be like this.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....