कतूहल कोळ्याच्या/कोष्टयाच्या जाळे विणण्याचे...…

 
कोळी  जाळे कसे विणतो...…..🕸️
🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️

🕷️कोष्टी/कोळी/spider जाळे कसे विणतो.... एक कुतूहल......🕸️
Spiderman marvel कॉमिक्स चा सुपर hero, सुट्ट्यांमध्ये मुलं अगदी  A vengers, marvels, spiderman च्या  animated movie बघतात,
त्यातला spiderman किती उड्या मारतो एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंग वर ,जमिनीवरून आकाशात कितीतरी animations देऊन vfx ,green screen वेगवेगळे effect s देऊन आकर्षक बनवल्या जातात, मुलांचे spiderman या काल्पनिक पात्राशी मुलं अगदी तल्लीन होवून जातात.
मला मात्र जेव्हा जेव्हा असे कॉमिक्स ,सिनेमा बघते तेव्हा त्या spider चं खूपच 'कुतूहल 'वाटते.
की निसर्गात असलेला original spider/कोळी/कोष्टी 
आपले जाळे कसे बरे विणत असेल?
कोळी/कोष्टी/spider हा शब्द नुसता उच्चारला तरी काही
लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. तर बहुतेकांच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या कोपऱ्यातील जाळे येते.
काय मग जाणून घेऊया "कुतूहल"कोळ्याच्या जाळ्या चे.
कोळ्यांचे जाळे अत्यंत विशाल व विस्तृत अशा स्वरूपाचे असते, त्याचप्रमाणे ते एका भौमितिक आकारात विणलेले असते. अशा भौमितिक आकारात कोळी जाळे कसे काय विणत असतील?
आहे न 'कुतूहल'🕸️
कोळी आपले जाळे तयार करण्यासाठी रेशमी धाग्याचा वापर करतात. रेशीम हे कोळ्याच्या शरीरात असलेल्या स्पिनरेट्सच्या मदतीने रेशीम ग्रंथीत तयार होतात.
स्पिनरेट्स म्हणजे असा अवयव जो कोळ्याला कोणत्या प्रकारचा रेशीम धागा हवा आहे हे ठरवणारा कोळ्याचा विशिष्ट अवयव. हे रेशीम धागे जाड किंवा पातळ असू शकतात, सुके किंवा चिकट (ओलसर)असू शकतात जेव्हा कोळी आपले जाळे विनण्यासाठी सुरुवात करतो तेव्हा त्याच्या शरीरातून पातळ द्रवपदार्थ बाहेर पडत असतो, जेव्हा त्या द्रवाचा हवेशी संपर्क येतो तेव्हा तो लगेच सुकतो व त्याचे धाग्यात रूपांतर होते.
कोळी आपला रेशीम धागा प्रथम एका आधाराला जसे झाडाच्या फांदीला ,घरातील कोपऱ्यात पकडून आपले जाळे विण न्यास सुरुवात करतो.ते धागे केंद्रकापासून निघून सरळ जातात ज्यांना त्रिज्यात्मक धागे असे म्हणतात. हे धागे संपूर्ण जाळ्याला बळकटी देतात. जे धागे वर्तुळाकार स्वरूपात असतात ,त्यांना कक्षीय धागे असे म्हणतात.
आता प्रश्न राहिलाय तो म्हणजे कोळी जाळे विणतो कशासाठी?
कोष्टी आपले भक्ष्य जसे एखाद्या किडा किंवा माशी त्या जाळ्यात अडकण्यास कोळी जाळे विणतो.
जाळ्या चे  धागे चिकट असल्याने किडा किंवा माशी या जाळ्यातून जाताना अडकुन बसतात.निसर्गातील कीटकांची संख्या नियमित राखण्यात spider चा मोठा वाटा असतो.
जाळ्यात अडकलेले कीडा ,माशी हे कोळ्यांचे अन्न असते व अन्न मिळवण्यासाठी तो हे जाळे विणतो.
आपण मात्र सुटीला त्याची अन्नसाखळी मोडून टाकतो.
🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️🕸️🕷️
#कोष्टी जाळे कसे विणतो
#कोळी/कोष्टी जाळे
#spider net
#कुतूहल कोळ्याच्या जाळ्या चे 
#spider net

  @उज्वला तायडे, अकोट


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....