कुतूहल निळ्या रंगाच्या आकाशाचे.....
'कुतूहल! 'आकाशाच्या निळ्या रंगाचे.....
आम्ही मुंबईला जात असताना माझा शाश्वत(माझा मुलगा)सारखा प्रत्येक station ला खिडकीतून डोकावून बघायचा. जेव्हा पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. माझ्या कुशीत येवून विचारले ,आकाश निळेच असते का ग?झोप आता म्हणून टाळलं त्याला.
सकाळी उठल्यावर त्यानी खिडकीतून बाहेर बघितले आणि जोरात माझ्याजवळ येवून मला मिठी मारत म्हणाला'इथले पण आकाश निळेच आहे'.केवढं 'कुतूहल'त्याला त्या निळ्या रंगाचे.............
नंतर माझ्या लक्षात आले जेव्हा आम्ही माझ्या नंदेकडे गेलो होतो तेव्हा परत येताना कारमधून उतरुन त्यानी त्याच्या आत्याला विचारले होते, की तुम्हाला पण निळा रंग आवडतो का?तेव्हा मात्र त्याच्याकडे बघून सर्वजण कौतुकाने हसले. तेव्हा साडेतीन, चार वर्षांचा होता शाश्वत. त्याला सांगितले आकाश तर सगळीकडे निळेच असते ना.
शाश्वत म्हणाला अ ग तसं नाही, आजी सांगते कृष्णाचा रंग निळा दिसतो न, मला तो आवडतो म्हणून त्यानी आकाश सुध्दा निळेच बनवले.
तेव्हा मला कळलं की टी. व्ही वर Disney channel वर little krisha चे cartoon दररोज आजी आणि तो बघतो. तेव्हापासून त्याच्यावर निळ्या रंगाचा एवढा effect झाला म्हणजे त्याला जवळजवळ निळ्या रंगानी अगदी भुरळ घातली. मग काय पुढे शाळेत गेल्यावर school bag, tiffinbag, water bottle, सर्वकाही निळेच. एवढेच नाही तर निळ्या रंगाचा प्रवास इथवर थांबला नाही घरातली त्याची प्रत्येक वस्तू म्हणजे खेळणी ,त्याची बेडशीट, त्याच्या खोलीचा रंग सर्व काही निळेच, तो निळा प्रवास अजूनही सुरूच आहे. केवढं 'कुतूहल'त्या निळ्या रंगाचे........
आपल्याला देखील असे प्रश्न पडतात.
आकाश निळे का दिसते, हा असाच एक प्रश्न-कधीतरी आपल्या मनात आलेला; आणि या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने फारसं काही अडत नसल्याने विस्मृतीत गेलेला!
नेमका हाच प्रश्न सर सी. व्ही. रामन यांना पडला होता. युरोपातून समुद्रमार्गे भारतात येत असताना दिसणाऱ्या विस्तीर्ण पसरलेल्या, आकाशाचा निळा रंग रामन यांच्यातल्या संशोधकापुढे'कुतूहल'निर्माण करत होता.........
सी. व्ही. रामन म्हटलं की आपल्याला28फेब्रुवारी हा दिवस आठवतो. खरं म्हणजे रामन यांची जन्मतारीख जर आपल्याला विचारली तर ती आपल्याला सांगता येत नाही. पण 28फेब्रुवारी ही तारीख मात्र आपल्या
डोक्यात पक्की असते. कारण28फेब्रुवारी1928या दिवशी रामन यांनी आपलं प्रकाशाच्या विकीरना संदर्भात केलेलं संशोधन जाहीर केलं आणि हे संशोधन'रामन इफेक्ट'या नावाने अजरामर झालं.
याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला.
काय बरं असेल 'रमण परिणाम'आहे की नाही 'कुतूहल'.जाणून घ्यायचे न.
जेव्हा प्रकाशकिरण अत्यंत लहान आकाराच्या कणांवर पडल्यावर सर्व दिशांना पसरतो यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात. आकाश निळे दिसण्यामागचा मूळ संबंध वायवरणातून प्रकाशाच्या विकिरणाशी आहे. दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीच्या तुलनेत हवेतील वायूंचे रेणू आणि वातावरणातील इतर सुक्ष्म कणांचे आकार खूपच लहान असतात .ज्या वेळी सूर्यप्रकाश वातावरणातून जातो त्या वेळी या सूक्ष्म कणांमुळे कमी तरंगलांबीच्या निळ्या रंगाचे जास्तीतजास्त प्रमाणात विकिरण होते.
विकिरण झालेला हा प्रकाश आपल्याला दिसत असल्याने आकाश निळे भासते.
युरोपातून भारतात समुद्रमार्गे परत येताना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर रामन यांनी मिळवलं, त्यावेळी आणखीही एक समज होता की आकाशाच्या निळ्या रंगाचे परावर्तन हेच समुद्राचं पाणी निळं दिसण्यामाग चे कारण आहे.
भारतात आल्यावर रामन यांनी पाणी आणि बर्फ यामधून होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणाचे प्रयोग केले आणि या प्रयोगांमधून असं दाखवून दिलं की समुद्राच्या निळ्या रंगमागच कारण म्हणजे पाण्याच्या रेणूंमुळे होणारे प्रकाशाचे विकिरण हे आहे.
एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण काही पदार्थावर रेणूंमुळे प्रकाशकिरणांचे विकिरण होते. आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबीइतक्या किरणांबरोबरच वेगळी तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात असं रामन यांनी सिद्ध केलं.
एखाद्या द्रव पदार्थावर पडणारे प्रकाशकिरण आणि त्या द्रव पदार्थामधून वापरल्यास विकिरण(scattering)प्रक्रियेमुळे वर्णपटलमध्ये नवीन रंगरेषा तयार होतात. एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात असं रामन यांनी सिद्ध केले.
आहे की नाही निळ्या रंगाचे "कुतूहल "भारी
🌧️🌨️⛈️💦💧🌦️☁️🌊💧🌨️🌧️🌩️
#कुतूहल निळ्या रंगाच्या आकाशाचे
#आकाशाचा निळा रंग
#प्रकाशाचे विकिरण
#scattering of light
#रामन परिणाम

@उज्वला तायडे, अकोट

खुप छान कुतुहुल
ReplyDeleteWell written all posts kutuhal.
ReplyDeleteNice 👌knoladgeble information. ✌️
Keep it up (Bali)uju.👍