पशुपक्ष्यांसाठी निवारा, वृक्षवल्लींचा आसरा......

कुतूहल .. ..पशुपक्ष्यांसाठी निवारा, वृक्षवल्लींचा आसरा...






निसर्ग हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे.
बागकाम ,पक्षी निरीक्षण ,निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे ,एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन अशा छंदामुळे विचारसरणी सकारात्मक होते, आत्मविश्वास वाढतो.
पावसाळा सुरू झाला की  save tree, save life म्हणत आपण झाडे लावत असतो, पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने, तळमळीने एका झाडाची जपणूक करतो तेव्हा, नुसते एक झाड जगवत नसतो तर त्यावर येणाऱ्या कितीतरी सजीवांची जपणूक करून निसर्गातील अन्नसाखळी सुरू ठेवत असतो, हे कसे बरे?आहे की नाही 'कुतूहल'!मग जाणून घेऊया.
              पशुपक्ष्यांसाठी अधिवासाचे नियोजन करताना तेथील वनस्पतींचा  विचार करणे महत्वाचे असते.विविध प्रकारची झाडे ,झुडुपे फुलझाडे लावल्यास असंख्य पक्षी, कीटक त्याकडे आकृष्ट होतात .
वनस्पती हा पशुपक्ष्यांच्या प्रत्यक्ष आहार असतोच शिवाय त्यावर आकृष्ट होणारे आणि पोसले जाणारे कीटक आणि अळ्या, पक्षी व प्राण्यांसाठी खाद्य ठरतात. घरटी करण्यासाठी ,निवाऱ्यासाठी आणि शत्रूंपासून संरक्षण, मिळण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. काही फळझाडांवर आणि फुलझाडांवर विशिष्ट प्रकारचे पक्षी आणि कीटक आकृष्ट होतात.
शिंजिर, फुलचुख्या, स्टारलिंग, भोरड्या,बुलबुलसारखे फुलातील मध खाणारे पक्षी काटे सावर, शेवगा, गुलमोहर, पांगारा अशा झाडांवर आढळतात.
तर मैना, तांबट, बुलबुल हे फळे खाणारे पक्षी बोर, उंबराच्या सर्व जाती, आंबा या झाडांवर येतात. शिंजिर पक्षी या झाडांच्या फुलातील मध खण्यासाठीही येतो. पोपट आणि हळद्या कडुनिंब आणि अशोकावर दिसतात.
माझ्याकडे असलेल्या mulberry plant वर जेव्हा, जेव्हा berries येतात तेव्हा तेव्हा  कोकीळ,बुलबुल, मैना हे पक्षी मोठया संख्येने  ती फळ खायला येतात.खारुताई चा तर कायमचाच निवारा असतो त्यावर, पक्ष्यांसाठी ठेवलेल्या भांड्यातील दाण्यांमध्ये तर खारुताई चा अर्धा वाटा असतो.
वनस्पतीवर केवळ पक्षीच नाही तर असंख्य प्रकारचे किटकही आकृष्ट होतात.
कीटकांच्या खाद्याविषयी माहिती करून घेतल्यास कोणती झाडे लावायची हे ठरवता येईल, याउलट आधीची झाडे असतील तर तिथे कोणते कीटक दिसू शकतील हे समजून येईल.
लिंबाच्या झाडावर आणि अमलताश वर फुलपाखरे आकृष्ट होतात. तर उंबर, बोर,बदाम, जांभळाची रोपे, पेरू हे विविध प्रकारच्या पटांगा चे खाद्य आहे. घाणेरी, झेंडू, कॉसमॉस, पेरीविनकल ,व्हरबिना, रक्तपर्णी, कोक्सकोंब, चमेली, मधु मालती ,कृष्णकमल या फुलझाडांकडे फुलपाखरे आणि पतंग याबरोबरच गांधीलमाश्या ,मधमाशा, मुंग्या आणि  माशा ,भुंगे आकर्षित होतात. यापैकी काहींसाठी या वनस्पतींकडून खाद्य मिळते(मध, पाने इ)तर काहींना अंडी घालण्यासाठी जागा .
एखादे कडुनिंबाचे झाड सुद्धा एक परिसंस्था म्हणून काम करते.
आणि शेवटी काय तर "जीओ जिवस्य जीवनम".
"Save tree ,save life"
मग काय आहे की नाही "कुतूहल"
#पशुपक्ष्यांसाठी निवारा
#वृक्षवल्लींचा निवारा
#save tree, save life
#कुतूहल
🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱

🌱🥀🦆🦋🐝🐜🐛🐌🐞🕷️🦂🦉🐢🐊🐍🦎🐡🦑🐌🐟🦀🦐🐦🐤🐧🐓🐔🦃🦇🐿️
    
           संदर्भ-माहिती इंटरनेट
     
                            उज्वला तायडे, अकोट
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....