कुतूहल...साप या मानवजातीच्या मित्राचे.....

साप मावजातीचा मित्र कसा?आहे न कुतूहल,
साप म्हंटल की अंगावर शहारे येतात, भीती वाटते,
निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये प्राणी महत्वाची भूमिका निभावत असतात. अगदी मानवा सहित प्रत्येक लहान, मोठा प्राणी कोणत्या न कोणत्या प्रकारे इतर प्राण्यांवर अवलंबून असतो.
साप कसा बरं मित्र असू शकतो?
सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे आणि उंदरांची प्रजनन क्षमता प्रचंड आहे.एक नरमादी उंदराची जोडी वर्षाला 850पिलांना जन्म देते.उंदीर देशातील 25ते30%धान्य खातात.तसेच त्यांची नासाडी करतात.
अशावेळी उंदीर घुशींच्या संख्येवर नियंत्रण राखण्याचे काम साप करतात.त्याचप्रमाणे पान साप आणी झाडावरचे साप पिकावरील छोटे कीटक खातात त्यामुळे पिकांचे संरक्षण होते.पान सर्पाची पिल्ले डासांची अंडी ,अळ्या खातात त्यामुळे डासांच्या निर्मितीला आळा बसतो.साप हे शेतकर्यांचेच नव्हे तर पर्यावरण संतुलन चे कार्य करणारे सर्व मानवजातीचे मित्र आहेत.सापांच्या विषात विषारी द्रव्यप्रमाणे मानवास उपयुक्त असणारी पोषकद्रव्ये पण असतात.
सापाचे विष हे एक उपयुक्त औषध आहे.घोणस च्या विषात रक्ताच्या गुठळ्या बनवण्याचा गुणधर्म आहे.
त्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.गर्भाशय आणि बुब्बुळ यातून वाहणाऱ्या रक्तावर देखील हा उपचार यशस्वी ठरत आहे.दमा, उसन, संधिवात,माकड हाडाचे दुखणे,निद्रानाश यावर rattle सापाचे विष उपयोगात आणले जात आहे.सर्पदंश झाल्यावर प्रतिसर्प विष ही injections दिली जातात.त्यामध्ये प्रामुख्याने सर्पविषाचाच उपयोग केला जातो.म्हणून सापाचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.म्हणून साप हा मानवाचा मित्र आहे.
सुमारे 85%सर्प बिनविषारी असतात,योग्य काळजी व योग्य उपायाने विषारी सर्पदंश झालेली व्यक्ती पूर्ण बरी होवू शकते.
सर्पदंश झाल्यावर घाबरून न जाता त्या सापाला लगेच न मारता तात्काळ सर्पमित्र कडून खात्री करून घ्यावी, विषारी असल्यास दवाखान्यात जावे.
काही प्रथमउपचार  म्हणून साप चावलेल्या व्यक्ती ला कोणतीही हालचाल न करू देत शांतपणे झोपवून ठेवावे, कारण सर्पदंश झालेली व्यक्ती प्रचंड तानाखाली असते ,त्यास पांघरूण घालून उबदार ठेवावे. ज्या अवयवाला सर्प दंश झाला त्या अवयवाच्या हृदयाच्या बाजूस पट्टी बांधावी त्यासाठी जरूर वाटल्यास हातरुमाल वावरवा पट्टी करकचून न बांधता दंश झालेला अवयव व पट्टी यामध्ये करंगळीच्या जाडीचे अंतर ठेवावे पट्टी प्रत्येक10 मिनिटांनी सैल करावी म्हणजे रक्तपुरवठा व्यवस्थित होईल,जखम हळुवार जंतूनशकाने धुवावी, जखमेवर उभे आडवे काप घेऊन जखम चघळवू नये.
तसेही प्राण्यांची काळजी घेणे ,त्यांचे रक्षण करणे ही आपल्या देशातील पुरातन परंपरा आहे. आपल्याकडे गाईचा मान राखला जातो, देवता समजून तिची पूजा देखील केली जाते. घरची गृहिणी जेवायला वाढण्यापूर्वी कावळ्याचा घास बाजूला काढून ठेवते. दक्षिण भारतात रोज सकाळी दारात तांदळाच्या पीठाने रांगोळी काढण्याची प्रथा आहे. यामागे मुंग्यांना अन्न मिळावे हा उद्देश असतो. बहुतेक सर्व प्रांतातील लोकं पक्ष्यांना दाणे घालताना दिसतात. त्यामध्ये हौस तर असतेच पण परंपरा ही पाळली जाते.
परंतु या सापविषयी आपल्याकडे बरेच गैरसमज/अंधश्रद्धा आहेत त्यासुद्धा जाणून घेणे आवश्यक ठरेल.
🐍साप दूध पितो-सर्वात मोठा गैरसमज-
गारुडी लोक सापाच्या तोंडात नरसाळे कोंबून त्यामधून दूध ओततात.अशाप्रकारे ते सापाचा क्रूरपणे छळ करतात.
🐍सापांना सुगंध आवडतो म्हणून तो केवड्याच्या वनात राहतो.-केवड्याचे झुडूप असते आणि ते दाट आणि थंड असते.जसे इतर ठिकाणी थंडाव्याला साप राहतात ,सुगंध असल्यामुळे नाही.
🐍साप दुक धरतो-सापाचा मेंदू प्रगत झालेला नाही त्यामुळे त्याची स्मरणशक्ती अतिशय कमी असते म्हणून तो दुक धरत नाही.
🐍धामण साप हा गायीच्या किंवा म्हशीच्या पायांना विळखा घालून दूध पितो हा गैरसमज आहे.
🐍दुरक्या घोणस चावला असता कृष्ठरोग होतो,हे खरे नाही हा गैरसमज आहे.
🐍जुनाट सापाच्या अंगावर केस असतात हे खरे नाही 
🐍नागाच्या डोक्यावर नागमणी असतो हे खरे नाही.
🐍साप धनसंपत्ती चे रक्षण करतो हे खरे नाही-पूर्वी वाड्यात संपत्ती पुरत असत,जुनाट वाड्यात अनेक उंदीर असतात.उंदीर खायला साप येतात कदाचित पुरलेली संपत्ती आणि नाग एकाच वेळी खोदून काढण्याची शक्यता आहे त्यामुळे हा गैरसमज पसरला असावा.
🐍सापाचे विष मंत्राने उतरवता येते हे खरे नाही-सर्पविष कधीही मंत्राने उतरत नाही,सर्पविषाव र सर्पप्रतिबंधक injection हाच एकमेव उपाय आहे.
🐍भक्ष्याच्या शरीरात विष सोडण्यासाठी साप उलटा असतो,असा गैरसमज आहे- चावा घेतल्यानंतर दात काढण्यासाठी साप उलटा होतो. जबड्याचे स्नायू शिथील होतात त्यामुळे दात आपोआप निघतात .
🐍साप हजारो वर्षे जगतो असा गैरसमज आहे-सापाचे आयुष्य जास्तीतजास्त25ते30वर्षांचे असते.
🐍धामण व म्हैस यांची नजरा नजर झाली की म्हैस मरते -हे खरे नाही म्हैस मरण्याची अनेक कारणे आहेत.
🐍रॉकेलने साप सापाला पुन्हा जीवन मिळते असा गैरसमज आहे-साप मरतात तेव्हा त्याचे डोके ठेचतात बाकी शरीराच्या पेशी काही काळ  जीवंतअसतात रॉकेल टाकल्यामुळे पेशींमध्ये जळजळ होते म्हणून त्याचे शरीर वळवळते.
🐍पट्टेदार साप चावल्याने शरीरावर चत्तेपट्टे उठतात हा गैरसमज आहे.हे चत्तेपट्टे त्वचा रोगाचे असू शकतात.
🐍साप गाडीखाली आल्यास पाठलाग करतो असा गैरसमज आहे ,मेल्यानंतर सर्व संपते.
🐍कोणत्याही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या दुव्याने किंवा मंत्राने विष संरक्षक कवक तयार होते हे खरे नाही.
🐍पूजेने साप प्रसन्न होतो असा गैरसमज आहे पूजेचा अर्थ समजण्या इतपत सापाची बुद्धी तल्लख नसते.
किती सारे गैरसमज आहेत सापाची.
साप हा प्राणी इतर प्राण्यांप्रमाणे असला तरीही त्यांच्याबाबतीत असे अनेक गैरसमज आढळतात.
एखाद्या प्राण्यांविषयी असलेलं अज्ञान हे त्याविषयी गैरसमज पसरवत असते .सापांबाबत अंधश्रद्धा आणि गैरसमजुती पसरण्यास एक कारण म्हणजे त्याचे विशिष्ट असलेले रंगरूप.
असो साप हा आपला मित्र आहे आणि त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
लहान मुलांना नैसर्गिकरित्या प्राण्यांबद्दल प्रेम वाटत असते. परंतु शहरी वातावरणात मात्र मुलांचा पक्षी आणि प्राणी ह्यांच्याशी कवचितच संबंध येतो .याचा परिणाम म्हणजे मुलं एकतर या प्राण्यांना घाबरतात किंवा त्यांची मने प्राण्यांबद्द्ल अकारण कलुषित होतात, त्यांना प्राण्यांबद्दल काही संवेदनाच वाटत नाहीत.
मुलांनी प्राण्याची काळजी घ्यावी, त्यांच्याशी संवेदनशील भावबंध जोडावेत म्हणून मुद्दा म प्रयत्न केले पाहिजेत.
मग काय आहेत न साप मानवाचे मित्र ,आहे की नाही "कुतूहल"
'चला तर मग सापांचे संरक्षण करू, निसर्ग संतुलनासाठी हातभार लावू'

#कुहतुल
#साप मानवाचा मित्र
#बिनविषारी साप
#सापविषयी गैरसमज
#अंधश्रद्धा सापविषयी
🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍
🐍काही बिनविषारी साप🐍

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....