सावली साथ सोडते तेव्हा चे कुतूहल
सावली साथ सोडते तो दिवस ...... सावली साथ सोडते तेव्हा....... असं म्हणतात की माणसाची सावली
त्याची कधीच साथ सोडत नाही. पण जर काही काळासाठी आपली सावली नसेल तर? मला ह्या
गोष्टींचे नेहमी कुतूहल वाटायचे. खरंच किती कुतूहल आहे न? हे बघायचे असेल तर सर्वात
सोपी गोष्ट म्हणजे सावली पाहणे. शाळेत असताना शिक्षकांकडून कळलं की
सुर्यप्रकाशासमोर कोणतीही वस्तू असली की तिची दिसते. पण नेमकं काय काय होत असेल?काय
घडत असेल, असं नेहमीच त्या सूर्याकडे बघून कुतूहल वाटायचं... - आज corona covind _19 lockdown मुळे हे सावली बघण्याचे कुतूहल पूर्ण झाले. पृथ्वीवर राहून पृथ्वीचा परीघ आणि त्रिज्या मोजण्याचे स्वप्न प्रयोग करून lockdown मुळे सहज शक्य झाले. अदभुत, अविस्मरणीय अनुभव होता शून्य सावली दिवसाच्या प्रयोगाचा. खरंतर दररोज दुपारच्या वेळी सूर्य डोक्यावरून जात नाही. दररोज दुपारी एखाद्या उभ्या खांबांची सावली आपण पाहिली की लगेच लक्षात येईल. सहसा जेव्हा सूर्य आकाशात सर्वाधिक उंच स्थानी असतो(त्याला स्थानिक मध्यान्ह, local noon)म्हणतात. तेव्हा तो प्रत्यक्षात शिरोबिंदूच्या(zenith)थोड्या उत्तर किंवा दक्षिणेकडून जातो. पृथ्वीचा अक्ष23.5°अंशातून कललेला असल्याने असे घडते. पृथ्वीचा अक्ष कललेला असणे हे ऋतुबदलाच कारण ही आहे. आपण जर रोज मध्यान्ह वेळीची सूर्याची जागा पाहत गेलो तर22डिसेंम्बर रोजी सूर्य शिरोबिंदूच्या जास्तीतजास्त दक्षिणेला असतो. या दिवसाला अवष्टंम्भ दिन म्हणतात(winter solstice day)त्याचप्रमाणे21जूनला सूर्य शिरोबिंदूच्या जास्तीतजास्त उत्तरेला असतो या दिवसाला विष्टम्भ दिन म्हणतात. उत्तर गोलार्धात विष्टम्ब दिनी मध्यान्ह वेळी खांबांची सावली सर्वात छोटी असते. अवष्टंम्भ दिनापासून ते विष्टम्ब दिनापर्यंत सूर्य उत्तरेकडे सरकत राहतो, यालाच उत्तरायण असे म्हणतात, तर विष्टम्भ दिनापासून सूर्य दक्षिणेस सरकतो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. जर तुमचे अक्षांश_23.5°आणि+23.5°अक्षा दरम्यानएका विशिष्ट दिवशी, सूर्य स्थानिक मध्यान्ह वेळी थेट डोक्यावरून(शिरोबिंदूमधून)जाईल. बरोबर त्या दिवशी भर मध्यान्ह वेळी उभ्या खांबांची सावली अजिबात दिसणार नाही. यालाच शून्य सावली दिवस zero shadow day असे म्हणतात. आपण राहत असलेल्या ठिकाणचे अक्षांश, रेखांश तसेच स्थानिक मध्यान्ह वेळ आणि काही विशिष्ट सूत्रांच्या आधारे रॉड, ग्राफ पेपर, स्पिरिट लेव्हल checking साठी water bottle, होकायंत्र, मोजपट्टी यांच्या साहाय्याने शून्य सावली दिवशी सकाळी11ते1 च्या दरम्यान नोंदी घेऊन शून्य सावली दिवसाच्या कुतूहलाचा आनंद घेता आला. खरंच आहे न कुतूहल ,पृथ्वीची त्रिज्या आणि परीघ मोजण्याच्या टप्प्यातील महत्वपूर्ण घटना म्हणजे "zero shadow day"म्हणजे "शून्य सावली दिवस".
- #शून्य सावली
- #zero shadow day
- #कुतूहल शून्य सावलीच्या दिवसाचे#
- #सावली साथ सोडते तेव्हा#
उज्वला ताई खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे 👌👍
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete